Join us

भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त; भारत अ संघाचे करणार प्रतिनिधित्व

भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याची माहिती BCCIने दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:56 IST

Open in App

मुंबई - भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याची माहिती BCCIने दिली. त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती आणि त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. पण आता तंदुरुस्त झालेल्या भुवनेश्वरची भारताच्या अ संघात निवड करण्यात आली असून तो संघासोबत दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. " भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो भारत अ संघाचे आगामी चार देशांच्या मालिकेत प्रतिनिधित्व करणार आहे. त्याशिवाय तो दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धही खेळणार आहे," असे BCCI ने स्पष्ट केले. 

२८ वर्षीय भुवनेश्वरने कंबरेच्या दुखापतीमुळे इंग्लंड मालिकेतून माघार घेतली होती. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला हा त्रास जाणवला होता. त्यानंतर तो बंगळूरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत होता. आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात कमबॅक करण्याचे लक्ष्य भुवनेश्वरने ठेवले आहे.

टॅग्स :भुवनेश्वर कुमारक्रिकेटक्रीडाबीसीसीआय