भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी ( Navdeep Saini) यानं मागील काही वर्षांत क्रिकेट वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांना त्यानं अनेकदा अडचणीतही आणले आहे. त्यानं आतापर्यंत २ कसोटी, ७ वन डे आणि १० ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक कसोटी मालिकेतील विजयात त्याचाही हातभार होता. महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
पण, नवदीप सैनी सध्या वेगळ्याच पोस्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यानं ७ वर्षांपूर्वी केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. ४ जून २०१३मध्ये त्यानं ही पोस्ट केली होती. या पोस्टमधील फोटोत तो चषकासह उभा असलेला दिसत आहेत. चाहतेही त्याचं कौतुक करत आहे आणि एकानं तर चक्क त्याला ज्युनियर श्रीसंत (Junior Sreesanth) असे म्हटले. त्याला रिप्लाय देताना नवदीपनं, भाई मुझे नही बनना श्रीसंत, मुझे ब्रेट ली बनना है. असा रिप्लाय दिला.