Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझ्या बॅटमध्ये AI चिप आहे का?" वैभव सूर्यवंशीनं दिलं भन्नाट उत्तर; व्हिडिओ व्हायरल

यंदाच्या हंगामात ४०० धावा करणारा पहिला बॅटर ठरला वैभव

By सुशांत जाधव | Updated: April 29, 2026 20:16 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi On  Pakistan expert’s ‘AI chip’ remark amidst IPL 2026 : १५ वर्षीय वंडरबॉय वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी म्हणजे जगातील आठवे आश्चर्यच. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या गोलंदाजांसमोरही तो अगदी बिनधास्त अंदाजात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत आहे. त्याच्या स्फोट फलंदाजीची फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतात चर्चा रंगताना दिसत आहे. त्यात पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ नोमान नियाझ यांनी केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. एका कार्यक्रमात त्यांनी मजेशीर अंदाजात वैभव सूर्यवंशी AI चिप लावलेल्या बॅटनं खेळत असावा, अशी टिप्पणी केली होती. त्याचं हे वक्तव्य चर्चेत असताना आता त्यावर वैभव सूर्यवंशीनं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

“तुझ्या बॅटमध्ये AI चिप आहे का?”

राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून वैभव सूर्यवंशीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. “तुझ्या बॅटमध्ये AI चिप आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर युवा बॅटर हसत म्हणाला, “देवानेच जणू हे वरदान दिलं आहे… वरच सांगितलं होतं की तुमच्या बॅटमध्ये काहीतरी खास लावून देतोय, आणि मी तेच वापरतोय.” त्याच्या या मिश्कील उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम

यंदाच्या हंगामात ४०० धावा करणारा पहिला बॅटर ठरला वैभव

RR नं शेअर केलेल्या व्हिडिओवर आइसलँड क्रिकेट बोर्डानेही मजेशीर कमेंट केली आहे. “वैभव सूर्यवंशी ज्या AI चिप्स वापरतो, त्या आम्हाला कुठे मिळतील? आमच्या संघर्ष करणाऱ्या फलंदाजांसाठी विचारतोय.” सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात ९ सामन्यांत ४०० धावांचा पल्ला पार केला आहे. यंदाच्या हंगामात हा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी ४४.४४ तर स्ट्राइक रेट तब्बल २३८.०९ च्या घरात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi's witty reply to AI chip bat query goes viral.

Web Summary : Teenage batting sensation Vaibhav Suryavanshi humorously responded to claims about using an AI-chipped bat. Asked by Rajasthan Royals, he joked it's a gift from God. He is the first batter this season to score 400 runs.
टॅग्स :आयपीएल २०२६वैभव सूर्यवंशीराजस्थान रॉयल्स