- एबी डिव्हिलियर्स
आयपीएलचा हंगाम सुरू झाला. या हंगामात छाप सोडण्यासाठी दमदार, चतूर आणि निरंतर कामगिरी करण्याची आरसीबीला संधी आहे. सलामीला आम्ही गतविजेते चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळणार असून आरसीबीसाठी शानदार सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. आम्ही शानदार तयारी केली असून विजयासाठी उत्सुक आहोत.
अपयश मागे सोडून आमचा संघ यंदा अपेक्षापूर्तीसह चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणू शकतो, याची पाच कारणे मी तुम्हाला सांगणार आहे.
१) गॅरी कर्स्टन हे मुख्य कोच म्हणून संघासोबत आहेत. त्यांच्याकडे अनुभवाचा मोठा साठा आहे. त्यांनी स्वत:ला लीडर सिद्ध केले असून प्रत्येक गोष्टीवर पकड आहे. मी त्यांच्यासोबत काम केले असून संघाला प्रेरणा देताना पाहून सुखद अनुभव मिळतो.
२) संघ फार संतुलित आहे.क्रिकेटची क्षमता शानदार आहे पण अनुभवी आणि युवा खेळाडूंचा ताळमेळ आहे. आरसीबीच्या याआधीच्या संघात असे मिश्रण पहायला मिळाले नव्हते. एकूणच चेंडृू आणि बॅट यामध्ये ताळमेळ साधण्यात आल्याने संघ बलाढ्य वाटतो,
३) द. आफ्रिकेचा हेन्री क्लासन या मधल्या फळीतील फलंदाजाला संघात घेण्याचा निर्णय योग्य आहे. तो फिरकीला न घाबरता खेळतो.
४) शिमरोन हेटमायर संघाला नवी उंची प्रदान करतो. अलिकडे विंडीजसाठी तोअनेकदा ‘मॅचफिनिशर’ ठरला. टी-२० साठी तो नवी ताकद आहे. गयानाहा हा डावखुरा फलंदाज सरावादरम्यान फॉर्ममध्ये असल्याचे जाणवले.
५) मैदान आणि बाहेर आमचा संघ ‘प्रोफेशनल’ आहे. आमचा कर्णधार विराट कोहली संघाला नव्या वाटा दाखविण्याच्या प्रयत्नात असतो.
आमच्यात कमालीचा आत्मविश्वास असला तरी अन्य संघांकडे नव्या योजना आणि डावपेच आहेत. क्रिकेट विश्वात ही सर्वांत रोमहर्षक स्पर्धा आहे. येथे शानदार ‘थरार’अनुभवायला मिळेल. चेन्नईत सीएसकेविरुद्ध सलामीचा सामना खेळण्यात कुठलीही अडचण नाही. आम्ही संतुलित असून जिंकण्याची प्रेरणा लाभलेला संघ हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेच, आता वेळ आली आहे... (टीसीएम)