Join us  

महाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात बंगालला ६१ धावांची आघाडी

सी. के . नायडू चषक क्रिकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 7:47 PM

Open in App
ठळक मुद्देस्वप्नील फुलपगरचे अर्धशतकस्वप्नील फुलपगरने सर्वाधिक ७४ धावांचे योगदान दिले.बंगालने यजमान महाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात ६१ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली .

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी, तिसऱ्या दिवसअखेर बंगालने यजमान महाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात ६१ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली . बीसीसीआयतर्फे आयोजित ही स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर सुरू आहे. बंगालने पहिल्या डावात १२४.३ षटकांत सर्व बाद ३३३ धावा केल्यानंतर या संघाच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. यजमान संघ पहिल्या डावामध्ये १३० षटकांत २७२ धावाच करू शकला. तिसºया क्रमांकावरील फलंदाज स्वप्नील फुलपगरने सर्वाधिक ७४ धावांचे योगदान दिले.सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला (३) झटपट बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर ऋषिकेश मोटकर (३६) आणि फुलपगर यांनी दुसºया गड्यासाठी ९८ धावांची भीगीदारी करीत महाराष्ट्राला सावरले. एकवेळ महाराष्ट्राचा डाव १ बाद १०९ असा सुस्थितीत होता. मात्र, ६६ धावांच्या मोबदल्यात महत्वाचे ५ फलंदाज गमावल्याने हा संघ ६ बाद १७५ असा अडचणीत आला.यश क्षीरसागर (४९) आणि ओंकार आखाडे (३८) यांनी सातव्या गड्यासाठी ६३ धावा जोडत पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या महाराष्ट्राच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, यश बाद झाल्यावर ओंकारचा एकाकी प्रतिकार अपयशी ठरला. बंगालतर्फे वेगवान गोलंदाज अनंता साहा याने प्रभावी मारा करताना ५६ धावांत ५ गडी बाद केले. आकाशदीपने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.शनिवारी सामन्याचा अखेरचा दिवस आहे.

संक्षिप्त धावफलक :बंगाल : पहिला डाव : १२४.३ षटकांत सर्व बाद ३३३.महाराष्ट्र : पहिला डाव : १३०.५ षटकांत सर्व बाद २७२ (स्वप्नील फुलपगर ७४, यश क्षीरसागर ४९, ओंकार आखाडे ३८, ऋषिकेश मोटकर ३६, अनंता साहा ५/५६, आकाशदीप ३/७४, रित्विक रॉयचौधरी १/६, कनिष्क सेठ १/५५).

टॅग्स :बीसीसीआयमहाराष्ट्र