विश्वचषकाआधी बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतेल, इंग्लंड संघाला पुन्हा खेळण्याची आशा

Ben Stokes : पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्टोक्स आपला निर्णय बदलून पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळेल, अशी आशा इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांनी व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:39 AM2022-11-16T05:39:45+5:302022-11-16T05:40:33+5:30

whatsapp join usJoin us
Ben Stokes will return to ODIs before the World Cup, England hope to play again | विश्वचषकाआधी बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतेल, इंग्लंड संघाला पुन्हा खेळण्याची आशा

विश्वचषकाआधी बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतेल, इंग्लंड संघाला पुन्हा खेळण्याची आशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न : इंग्लंडला टी-२० विश्वचषक जेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या बेन स्टोक्सने याचवर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्टोक्स आपला निर्णय बदलून पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळेल, अशी आशा इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांनी व्यक्त केली आहे. 
पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात स्टोक्सने नाबाद ५३ धावांची खेळी करत इंग्लंडला विश्वविजयी केले होते. तसेच, २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक अंतिम सामन्यातही स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या. 

Web Title: Ben Stokes will return to ODIs before the World Cup, England hope to play again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.