Join us

Big Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला!

राजस्थान रॉयल्सनं ( RR) संघानं गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:47 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सनं ( RR) संघानं गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यानं १८ चेंडूंत नाबाद ३६ धावा चोपून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आयपीएलच्या १४व्या पर्वात मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला. पण, या विजयानंतर त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याला १२ आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीसाठी ए आर रेहमाननं डेडिकेट केलं 'भन्नाट' गाणं, सुरेश रैनासाठी 'मांगता है क्या'!

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलची कॅच घेताना त्याला ही दुखापत झाली आणि त्याचं बोट तुटल्याची माहिती  RR ने दिली. तो आयपीएलच्या फायनलपर्यंत संघासोबतच राहणार असल्याचेही RRने सांगितले होते, परंतु ताज्या माहितीनुसार त्याची दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. शनिवारी तो इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान

इंग्लंडचा संघ न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत यांचा पाहुणचार घेणार आहे. पण, आता बेन स्टोक्स पहिल्या दोन मालिकांना मुकण्याची चिन्हे दिसत आहेत.  

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सबेन स्टोक्स