आकाश नेवे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या विश्व विजेतेपदाचा नायक ठरलेला बेन बेन स्टोक्स हा मुळचा न्युझीलंडचा आहे. त्याचा जन्म ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता. मात्र आपल्या कर्मभूमीकडून खेळताना त्याने मायभूमीलाच पराभूत केले. बेंजामीन अँड्र्यु बेन स्टोक्स याचे वडील गेरार्ड स्टोंक्स हे न्युझीलंडच्या रग्बी संघाकडून खेळले आहेत.
बेन १२ वर्षांचा असताना त्यांची इंग्लंडच्या एका क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि संपुर्ण कुटूंब इंग्लंडला स्थायीक झालं. २०१३ पर्यंत इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर गेरार्ड आणि इतर कुटूंबिय न्युझीलंडला परतले आणि पुन्हा ख्राईस्टचर्चमध्ये रहायला लागले. मात्र बेन इंग्लंडमध्येच राहिला. नंतर त्याची इंग्लंडच्या संघात वर्णी लागली. २०१६ चा टी २० विश्वचषक त्याच्यासाठी वाईट ठरला. अखेरच्या षटकांत कार्लोस ब्रेथवेटने चार षटकार लगावत इंग्लंडला पराभूत केले होते. त्याच बेन स्टोंक्स याने आता इंग्लंडला अंतिम फेरीत विजय मिळवून दिला.
बेन स्टोक्स याची विश्वचषकातील कामगिरी
विरुद्ध न्युझीलंड अंतिम सामना ८९
वि. भारत ७९
वि.श्रीलंका ८२
वि. दक्षीण आफ्रिका ८९
एकुण धावा ४६५
एकुण बळी ७