Join us

इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे वडील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:43 IST

Open in App

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे वडील गेड यांना जोहान्सबर्ग येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना गंभीर आजार झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्टोक कुटुंबियांसह गेड दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले होते, परंतु त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

बेन स्टोक्स आता जोहान्सबर्ग येथे वडिलांसोबत असेल, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या सराव सत्रात त्यानं सहभाग घेतलेला नाही. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार आहे. पण, आता या सामन्यात स्टोक्स खेळणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही. गेड हे न्यूझीलंडचे माजी रग्बीपटू आहेत. 

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडद. आफ्रिका