Join us

KL राहुल नर्व्हस नाइंटीचा शिकार! त्याला LBW केल्यावर बेन स्टोक्सचं 'नो लूक' सेलिब्रेशन (VIDEO)

लो लेंथ चेंडूवर फसला KL राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:03 IST

Open in App

IND vs ENG, Ben Stokes Gets Big Wicket Of KL Rahul :  मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात केएल राहुल आणि शुबमन गिल जोडी पहिला अर्धा तास जपून खेळताना दिसली. पहिल्या २७ मिनिटांत इंग्लंडच्या संघानं उरला सुरुला एक रिव्हू गमावला. पण त्यानंतर काही वेळातच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं टीम इंडियाच्या भरवशाचा फलंदाज KL राहुलला आपल्या जाळ्यात अडकवले. सलामीवीर लोकेश राहुलवर मँचेस्टर कसोटी सामन्यात नर्व्हस नाइंटीची नामुष्की ओढावली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बेन स्टोक्सचा 'नो लूक' सेलिब्रेशन

पायाच्या स्नायूच्या दुखापतीशिवाय खांद्याच्या दुखापतीच्या समस्येमुळे चौथ्या दिवसाच्या खेळात एकही षटक न टाकणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एका तासाच्या आत केएल राहुलला आपल्या जाळ्यात अडकवले.  केएल राहुल शतकापासून फक्त १० धावा दूर असताना तो पायचित झाला. चेंडू केएल राहुलच्या पॅडवर लागताच बेन स्टोक्सनं अंपायरकडे न बघता विकेटचं सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. 

IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

लो लेंथ चेंडूवर फसला KL राहुल

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात स्टोक्स आपले वैयक्तिक चौथे षटक घेऊन आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सनं मिडल अँण्ड लेग स्टंपवर लोअर लेंथ चेंडू टाकत केएल राहुलला चकवा दिला. KL राहुलनं २३० चेंडूचा सामना करताना ९० धावांची संयमी खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार मारले. शुबमन गिलसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी केलेली १८८ धावांच्या खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी होती. तो परतल्यावर आता कॅप्टन शुबमन गिलवर संघाची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

मँचेस्टर कसोटीतही बेन स्टोक्सचा जलवा

टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाच विकेट्सचा डाव साधल्यावर त्याने शतकी खेळी केली होती. दुखापतीनं त्रस्त असताना अखेरच्या दिवशी गोलंदाजीला आल्यावर त्याने आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. तो अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.