Ben Duckett Denies To Play IPL 2026 For Delhi Capitals : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामाला अवघे काही दिवस उरले असताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ज्या बेन डकेटला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २ कोटी या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते त्याने यंदाच्या हंगामात खेळण्यास नकार दिला आहे. "नॅशनल ड्युटी फर्स्ट..." असं म्हणत त्याने IPL च्या यंदाच्या हंगामात खेळू शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लिश क्रिकेटरची आयत्या वेळी माघार, BCCI कारवाई करणार?
आयत्या वेळी माघार घेतल्यावर त्याने DC संघाची माफीही मागितली आहे. पण चुकीला माफी नाही, म्हणत BCCI इंग्लिश क्रिकेटवर बंदीची कारवाई करणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूवर बीसीसीआयन कोणत्या प्रकारच्या कारवाईची तरतूद केली आहे? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
CSK च्या संघाला बदली खेळाडू मिळाला! ज्यानं साथ सोडली त्याच्या सहकाऱ्यावर दाखवला भरवसा
सोशल मीडियावरील पोस्ट शेअर करत मागितली माफी
इंग्लिश क्रिकेटरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलंय की, "माझ्यासाठी हा निर्णय घेणं खुप कठीण होते. पण खूप विचार केल्यावर IPL मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लहानपणापासून मी इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न पाहिले आहे. आगामी हंगामासाठी मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागत आहे. दिल्लीच्या संघाकडून खेळण्यास उत्सुक होतो. माझ्या निर्णयामुळे संघाच्या रणनितीवर परिणाम होऊ शकतो. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
खेळाडूंच्या मनमानीवर लगाम घालण्यासाठी BCCI नं केलाय कठोर नियम
IPL मध्ये आयत्या वेळी माघार घेणारा बेन डकेट हा काही पहिला खेळाडू नाही. याआधीही अशा प्रकारे खेळाडूंनी माघार घेतली आहे. बहुतांश वेळा परदेशी खेळाडूंकडूमुळेच IPL फ्रँचायझी संघ अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. याच अनुषंगाने २०२५ च्या हंगामाआधी BCCI ने IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूंसंदर्भात कठोर नियम लागू केला होता. या नियमानुसार, वैद्यकीय कारणाशिवाय आयत्या वेळी माघार घेणाऱ्या खेळाडूवर २ वर्षांच्या बंदीची कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक याच्यावर गत हंगामात या नियमानुसार कारवाईही झाली होती. याच नियमानुसार इंग्लंडच्या बेन डकेटवरही कारवाई होऊ शकते.
Web Summary : Ben Duckett's withdrawal from IPL 2026, citing national duty, has sparked controversy. BCCI might impose a two-year ban for late pullouts, similar to Harry Brook's case, as per stringent rules to curb player arbitrariness. DC faces setback.
Web Summary : बेन डकेट द्वारा राष्ट्रीय ड्यूटी का हवाला देते हुए आईपीएल 2026 से नाम वापस लेने पर विवाद। बीसीसआई खिलाड़ी की मनमानी रोकने के लिए हैरी ब्रूक के मामले की तरह दो साल का प्रतिबंध लगा सकती है। डीसी को झटका।