Join us  

Record : ट्वेंटी-20त भीमपराक्रम; 14 धावांत पडल्या 8 विकेट्स, 8व्या क्रमांकाच्या फलंदाजानं झळकावले शतक!

2019मध्ये श्रीलंकेच्या इसुरू उदानानं 8व्या क्रमांकावर येताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 नाबाद 84 धावांची खेळी केली होती. तो विक्रम आज मोडला गेला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 5:18 PM

Open in App

बेल्जियन विरुद्ध ऑस्ट्रिया यांच्यातल्या नाट्यमय ट्वेंटी-20 सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. बेल्जियमनं 12 धावांनी हा सामना जिंकला. बेल्जियमच्या 14 धावांवर 8 विकेट्स पडल्या होत्या आणि 8व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या साबीर जखीलनं ( Saber Zakhil) नाबाद शतकी खेळी करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मालिकेत बेल्जियमनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Tokyo Olympic, Hockey : ऑस्ट्रेलियानं लावली वाट; 45 वर्षांत टीम इंडियाचा असा लाजीरवाणा पराभव झालाच नाही!

ऑस्ट्रियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जलदगती गोलंदाज अकिब इक्बालने 5 आणि साहिल मोमिननं दोन विकेट्स घेत बेल्जियमला 5.5 षटकांत 14 धावांत 8 धक्के दिले. 8पैकी एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. या घसरणीनंतर बेल्जियमचा संघ 20 धावाही करू शकणार नाही असेच वाटत होते. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीपासून 19 सप्टेंबरला IPL 2021ला सुरुवात

8 बाद 14 अशा अवस्थेत बेल्जियमचा संघ असताना जखील व सकलेन अली यांनी 132 धावांची भागीदारी केली. जखीलनं 47 चेंडूंत 5 चौकार व 8 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 100 धावा केल्या. अलीनंही 39 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीनं नाबाद 26 धावा केल्या. ही जोडी तोडण्यासाठी ऑस्ट्रियानं 7 गोलंदाजांचा वापर केला.प्रत्युत्तरात ऑस्ट्रियानं 6.1 षटकांत 37 धावांत 3 विकेट्स गमावले होते. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला अन् डकवर्थ लुईस नियमानुसार ब्लेजियमनं 12 धावांनी विजय मिळवला. 2019मध्ये श्रीलंकेच्या इसुरू उदानानं 8व्या क्रमांकावर येताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 नाबाद 84 धावांची खेळी केली होती. तो विक्रम आज मोडला गेला. 

टॅग्स :टी-20 क्रिकेट
Open in App