Join us  

रोहित-विराट यांच्यात नव्या मैत्रीची सुरुवात

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या संबंधांबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यावरून बातम्या बाहेर यायच्या. क्वारंटाईनदरम्यान या दोन्ही खेळाडूंमध्ये फार सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:17 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या संबंधांबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यावरून बातम्या बाहेर यायच्या. क्वारंटाईनदरम्यान या दोन्ही खेळाडूंमध्ये फार सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे अनेक महिने बायोबबलमध्ये वास्तव्य सोपे नाही. या कठोर क्वारंटाईन कालावधीत जो सकारात्मक बदल झाला, तो या दोन महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये झालेल्या नव्या मैत्रीची सुरुवात...क्वारंटाईन कालावधीत संघात वरिष्ठ असलेल्या या दोन्ही खेळाडूंसोबत वेळ घालविण्याची संधी कोच रवी शास्त्री यांना मिळाली. त्यांनी दोघांना एकत्र बसवून यावर तोडगा काढला. यानंतर दोन्ही खेळाडूंच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले. ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मालिका जिंकल्याचा आनंद ड्रेसिंग रूममध्ये होताच, शिवाय विराट-रोहित यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाल्याचादेखील आनंद होता. दोन्ही खेळाडू आपापल्या खेळाकडे अधिक लक्ष देतील, शिवाय संघाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एकदिलाने काम करणार आहेत. दोघांना कळून चुुकले असेल की, एका सुरात विचार केल्यास संघाला त्याचा लाभ होईल. मागच्या चार महिन्यांतील हे सर्वांत मोठे यश मानावे लागेल.डावाला प्रारंभ करण्यापासून मैदानावर एकमेकांच्या निर्णयाचा सन्मान करेपर्यंत कोहली आणि रोहित एकमेकांचा दृष्टिकोन समजू लागले आहेत. बायोबबल्समध्ये राहण्याचा अर्थ असा की, तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे, त्याचा लाभ घ्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही खेळाडूंबाबत बाहेरच्या वृत्तांमुळे कडवटपणा वाढीस लागला होता. अनेक ऐकिवातील गोष्टींमुळे वितुष्ट निर्माण होण्याची सवय भारतीय क्रिकेटसाठी नवीन नाही. सर्वच व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे विराट आणि रोहित यांच्यात सहमती नसतीलही. पण एकत्र बसून त्यावर तोडगा निघणे महत्त्वाचे होते. रवी शास्त्री यांनी हेच काम केले. संघाबाहेर असलेल्या अफवांना पूर्णविराम कसा देता येईल, यावर या दोन्ही दिग्गजांनी भर दिला. n विराट आणि रोहित हे मैदानावर एकमेकांशी संवाद साधतात. टी-२० मालिका आटोपताच पुरस्कार वितरणाच्यावेळी हे दृश्य दिसले. n दोघेही आधीच्या तुलनेत एकत्र फोटोत पाहायला मिळाले. वन डे मालिकेत विराट हा रोहितशी वारंवार संवाद साधताना आणि सल्ला घेताना दिसला. n हे आधीही घडले असेल, मात्र यावेळी या दोन्ही खेळाडूंनी लोकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये सकारात्मक संदेश कसा पोहोचेल याविषयी काळजी घेतल्यामुळे या मैत्रीचे धागे अधिक घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा