Join us

उत्कृष्ट कर्णधार बनण्यासाठी धोनी मास्तरांकडे शिकवणी लाव, मोहम्मद यूसुफचा सल्ला

धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा तिन्ही प्रकारात बराच काळ सांभाळली आहे, त्याने केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज व यष्टिरक्षक म्हणूनही ऊत्कृष्ठ कामगिरी केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:04 IST

Open in App

कराची - जागतिक क्रिकेटमध्ये यशस्वी आणि उत्कृष्ट कर्णधार व्हायचं असेल तर धोनी मास्तरांकडे शिकवणी लाव असा सल्ला पाकिस्तानच्या कर्णधाराला माजी कर्णधार मोहम्मद यूसुफनं दिला आहे. पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सर्फराज अहमदने त्याच्या फिटनेस व फॉर्ममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी चर्चा करून त्याच्याकडून सल्ला घ्यावा असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद युसूफ यांनी व्यक्त केले.

"मला वाटते की सर्फराजला त्याच्या फिटनेस व यष्टिरक्षणाच्या कौशल्यांवर आणखी मेहनत करण्याची गरज आहे व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्याला खूप वाव आहे." " धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा तिन्ही प्रकारात बराच काळ सांभाळली आहे, त्याने केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज व यष्टिरक्षक म्हणूनही ऊत्कृष्ठ कामगिरी केली आहे. सर्फराजला त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे याची जाणीव त्याला झाली आहे. तसेच त्याने यष्टिरक्षण व फलंदाजीवरही जास्तीत जास्त लक्ष्य केंद्रीत करणे अपेक्षित आहे." असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफ यांनी व्यक्त केलं आहे. 

सर्फराजने धोनीशी फिटनेस व फॉर्मविषयी चर्चा करण्यास काही हरकत नाही. धोनी सर्फराजला कर्णधारपदाचा व यष्टिरक्षणाचा तोल सांभाळत संघाला पुढे कसे न्यावे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन करू शकतो. धोनीच्या कर्णधार पदाचा कारकिर्दीत धोनीने भारताला एकदिवसीय विश्वचषक,चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक व आशिया कप जिंकून दिला आहे. त्याचबरोबर त्याच्या कर्णधार पदाच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला होता. त्यामुळं त्याच्या अनुभवचा फायदा सर्फराजनं घ्यावा. असे मला वाटते. असे मोहम्मद युसूफ म्हणाले. 

टॅग्स :एम. एस. धोनीपाकिस्तानक्रिकेट