IPL २०२६ च्या १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामासाठी BCCI नं IPL फ्रँचायझी संघ आणि खेळाडूंसह त्यांच्या फॅमिलीसंदर्भात काय नियम लागू केले आहेत. यात स्लीवलेस जर्सी वापरण्यावर बंदी एखाद्या खेळाडूला जर्सीवरील क्रमांक बदलायचा झाल्यास २४ तास आधी BCCI ला सूचना द्यावी लागेल. IPL संघातील खेळाडूंच्या नियमावलीतील जर्सीसंदर्भातील गोष्टी चर्चेत असताना RCB च्या संघातील विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी एकाच क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराटसह RCB चे सर्व खेळाडू ११ क्रमांकाची जर्सी घालून उतरणार मैदानात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आयपीएलमधील उद्घाटन सामन्यात सनरायझर्स हैदराबादला भिडणार आहे. या सामन्याआधी सराव करता वेळी संघातील सर्व खेळाडू ११ क्रमांकाची जर्सी परिधान करणार आहेत. फ्रँचायझीचे CEO राजेश मेनन यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
IPL मध्ये बाकावर बसून माफक पैसे कमावणारा क्रिकेटर झाला RCB चा सह मालक अन्...
या कारणास्तव RCB तील खेळाडू सेम टू सेम जर्सी वापरणार
रॉयल चॅलेंजर्स संघाचा हा निर्णय गत हंगामात जेतेपदानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर तुफान गर्दी उसळली होती. यादरम्याने चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ चाहत्यांनी जीव गमावला होता. त्यांच्या स्मरणार्थ RCB चा संघ सराव सत्रा वेळी ११ क्रमांकाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. ते चाहते आमच्या प्रवासाचा सदैव भाग राहतील, त्यांच्या श्रंद्धाजली वाहण्याच्या हेतूने RCB संघाने हा निर्णय घेतल्याचे मेनन यांनी स्पष्ट केले.
स्टेडियमवरील ११ सीट्सही कायम स्वरुपी राखीव ठेवण्याचा निर्णय
मेनन यांनी यावेळी स्टेडियम चाहत्यांसाठी सुरक्षित असल्याचे सुनिश्चित केल्याची माहितीही दिली सरकारी आणि न्यायालयीन SOP चे पालन करून सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आले आहेत. सामन्यापूर्वी RCB अधिकारी स्टेडियमच्या आतील प्रवेशद्वाराजवळ स्मारक पट्टा ठेवणार आहेत, ज्यामुळे स्मरणासाठी खास जागा उपलब्ध होईल. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या वतीने चेंगराचेंगरीतील जीव गमावलेल्या ११ जणांसाठी स्टेडियमवरील ११ सीट्स कायम स्वरुपी राखीव ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे.