Join us

नाडासोबत बीसीसीआय सहा महिने काम करणार, त्रिपक्षीय करार

‘आगामी सहा महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) साथीने कार्य करणार आहोत,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:00 IST

Open in App

मुंबई : ‘आगामी सहा महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) साथीने कार्य करणार आहोत,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रशासकांच्या समितीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आयसीसी, बीसीसीआय व नाडा यांच्यादरम्यान त्रिपक्षीय करार होणार आहे. त्यानुसार नोंदणीकृत खेळाडूंचे नमुने राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेमध्ये नाडाच्या अंतर्गत जातील. यापूर्वी स्वीडनची ‘आयडीटीएम’ नमुने एकत्र करीत होती. आमचे समाधान झाले नाही, तर कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नाही.’ त्याचवेळी बीसीसीआयने अद्याप नाडाला आपल्या भूमिकेची कल्पना दिली नाही.नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल म्हणाले,‘मला लिखित काही मिळाल्यानंतरच याबाबत मत व्यक्त करेल. मला अद्याप अधिकृत सूचना मिळालेली नाही.‘ या बैठकीमध्ये भविष्यातील विश्व दर्जाच्या स्पर्धांमध्ये करात सूट मिळण्याबाबतही चर्चा झाली आणि बीसीसीआयने मनोहर यांना आपल्या योजनांबाबत माहिती दिली.विश्व डोपिंगविरोधी एजन्सीने (वाडा) बीसीसीआयने नाडाच्या कक्षेत यावेच लागेल, असे आयसीसीला स्पष्टपणे कळवले आहे. बीसीसीआयने अटीसह मान्यता देताना नमुने स्वत: एकत्र करीत नाडाला देणारा असल्याचे म्हटले आहे.अधिकारी म्हणाले, ‘नाडाच्या डोप नियंत्रण अधिकाऱ्यांवरआमचा विश्वास नसल्याचे आम्ही सांगितले. नाडा डीसीओद्वारेनमुने योग्यपणे एकत्र करीत नसल्याची अनेक उहारहणे आहेत. आम्हीविराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांबाबत बोलत आहोत. आम्ही त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत नाही. आम्ही १० टक्केच नमुने उपलब्ध करून देऊ.’ (वृत्तसंस्था)बीसीसीआयला दिले १६ लाख डॉलरद्विपक्षीय मालिका खेळण्यापासून घूमजाव केल्याचा आरोप करीत दावा दाखल करणाºया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीच्या समाधान समितीपुढे तोंडघशी पडावे लागले. यामुळे बीसीसीआयला नुकसान भरपाई म्हणून १६ लाख डॉलर दिल्याचा दावा पीसीबी प्रमुख एहसान मनी यांनी सोमवारी केला.२०१५-२०२३ या कालावधीत उभय बोर्डादरम्यान ६ मालिका होणार होत्या. तथापि दहशतवादाला चिथावणी देणाºया पाकविरुद्ध खेळायचे नाही, अशी भूमिका भारत सरकारने घेतली. ‘पीसीबीने गतवर्षी आयसीसी वाद समाधान समितीपुढे बीसीसीआयविरुद्ध ७ कोटी अमेरिकन डॉलरची नुकसान भरपाई मागितली. यावर निकाल बीसीसीआयच्या बाजूने निर्णय आला. यानंतर वेळ खर्ची घातल्याचा ठपका ठेवून बीसीसीआयने पीसीबीविरुद्ध नुकसान भरपाई मागितली होती. ती आज देण्यात आली,’ असे मनी यांनी सांगितले.

टॅग्स :बीसीसीआयआंतरराष्ट्रीय