Join us  

IPL 2021 Schedule : आयपीएलची तारीख जाहीर करून बीसीसीआयनं दिलं ICCला चॅलेंज, संघर्ष पेटण्याची चिन्हे! 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करून थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:31 PM

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयनं 29 मे रोजी घेतलेल्या बैठकीत उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवणार असल्याचे जाहीर केलेबीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असल्याचे जाहीर केले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करून थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) आव्हान दिले आहे. बीसीसीआयनं 29 मे रोजी घेतलेल्या बैठकीत उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवणार असल्याचे जाहीर केले आणि तेव्हापासून वादाला सुरुवात होणार असल्याची चिन्हे दिसू लागली. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतात होणारा ट्वेटी-20 वर्ल्ड कप यूएईत खेळवण्याच्या हालचाली आयसीसीनं सुरू केल्या आहेत. अशात बीसीसीआयनं तेथेच आयपीएलचे उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्यानं गोंधळाला सुरूवात झाली. नियमानुसार कोणत्याही स्पर्धेच्या 15 दिवस आधी सर्व स्टेडियम आयसीसी ताब्यात घेते. त्यामुळे बीसीसीआयला 15 ऑक्टोबरच्या आत आयपीएलचा दुसरा टप्पा संपवावा लागणार होता. पण, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असल्याचे जाहीर केले आणि आयसीसीला थेट आव्हान दिले. ( The remainder of the 14th edition of the Indian Premier League (IPL) will be played from September 19 and October 15 in the UAE as the Board of Control for Cricket in India (BCCI) officials confirmed) 

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बीसीसीआयन अन्य क्रिकेट संघटनांशी चर्चा करत आहे. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंतीही त्यांच्याकडून केली गेली आहे, परंतु ती अमान्य झाल्यात जमा आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांना वेस्ट इंडिजचे खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडचे खेळाडू खेळणार नसल्याचे त्यांच्या मंडळानं आधीच स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेण्याच्या तयारीत आहेत. आयपीएलचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाईल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी Times Now शी बोलताना सांगितले. Team-wise match fees : भारतीय खेळाडूंना मिळते सर्वाधिक मॅच फी?, उत्तर जाणून तुम्हाला बसेल धक्का ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाच्या निर्णयासाठी बीसीसीआयनं आयसीसीकडे एक महिन्यांची मुदत मागितली होती. 28 जूनपर्यंत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान आयपीएल 2021 आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत फार कमी कालावधी विश्रांतीसाठी मिळत आहे. त्यामुळे आयसीसी आयपीएलसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआयला मुदत देणार नसल्याची चर्चा आहे. पण, राजीव शुक्लाच्या घोषणेनं नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. " ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जुलै महिन्यात जाहीर केले जाईल. त्यामुळे आम्ही आताच काही प्रतिक्रिया देणार नाही. पण, आयसीसी स्पर्धा व अन्य स्पर्धांमध्ये गॅप असायलाच हवा असा काही नियम नाही. आयसीसीला खेळपट्टीतयार करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. तसाही नियम नाही, "असे आयसीसीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. भारतीय क्रिकेटपटू तासाला कमावतात एक लाख; शतक, द्विशतकासाठी मिळते भारी रक्कम, बोनस वेगळा!

टॅग्स :आयपीएल २०२१आयसीसी विश्वचषक टी-२०संयुक्त अरब अमिराती