भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन बीसीसीआयने यापूर्वी केवळ पहिल्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा केली होती, मात्र आता संपूर्ण स्पर्धेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव बीसीसीआयने टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ५० सामन्यांचे ठिकाण आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे.
यपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याला १३ एप्रिल २०२६ पासून सुरुवात होईल, ज्यात एकूण ५० सामने खेळवले जातील. हे सामने भारतातील १२ वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जातील. यामध्ये बंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धरमशाला, रायपूर आणि चंदीगड (मुल्लानपूर) यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या टप्प्यात एकूण ८ डबल हेडर सामने पाहायला मिळतील. साखळी सामने २४ मे रोजी संपतील. त्यानंतर बाद फेरीचे सामने खेळवले जातील. स्पर्धेचा महाअंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी खेळवला जाईल. बंगळुरूमध्ये मागील वर्षी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे यंदा बीसीसीआयने उद्घाटन समारंभ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समारोप समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे.
Web Summary : BCCI officially announced the IPL 2026 second phase schedule. Fifty matches will be held across 12 Indian cities starting April 13, 2026. The final match is on May 31, 2026. Eight double-header matches are scheduled. An opening ceremony will not be held but a grand closing ceremony is planned.
Web Summary : बीसीसीआई ने आधिकारिक तौर पर आईपीएल 2026 के दूसरे चरण का शेड्यूल जारी किया। 13 अप्रैल, 2026 से शुरू होकर 12 भारतीय शहरों में पचास मैच खेले जाएंगे। फाइनल मैच 31 मई, 2026 को है। आठ डबल-हेडर मैच निर्धारित हैं। कोई उद्घाटन समारोह नहीं होगा लेकिन एक भव्य समापन समारोह की योजना है।