Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2022: २५ टक्केच प्रेक्षकांना मिळणार प्रवेश; ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात

वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या पर्वाला सुरुवात होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 06:53 IST

Open in App

नवी दिल्ली : शनिवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या आयपीएल सामन्यांना केवळ  २५ टक्केच प्रेक्षक मैदानात उपस्थित असतील, असे आयोजकांनी बुधवारी स्पष्ट केले. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या पर्वाला सुरुवात होईल. त्यासाठी तिकीट ऑनलाईन विक्रीला बुधवारी सुरुवात झाली. सर्वांत कमी किमतीचे तिकीट ८०० रुपयांना उपलब्ध आहे.दोन वर्षे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षक  घरच्या मैदानात सामना पाहतील. हे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर खेळले जातील. मात्र यावेळी कोरोना नियमांमुळे एकूण बैठक क्षमतेच्या केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल.  लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स अशा दोन नव्या संघांसह ७४ सामने रंगतील. यापैकी ७० सामने मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबोर्न स्टेडियमसह नवी मुंबईतील डी. वाय. पाटील व पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगतील.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App