Join us  

Hardik Pandya: Mumbai Indians जिंकले, पण हार्दिक पांड्याला दणका! सामना संपताच BCCIने केली कारवाई, नक्की काय घडलं?

Mumbai Indians captain Hardik Pandya Fined, IPL 2024 MI vs PBKS: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पंजाबविरूद्धचा सामना कसाबसा जिंकला. त्यानंतर हार्दिकला BCCIने जोरदार धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:27 AM

Open in App

Mumbai Indians captain Hardik Pandya Fined, IPL 2024 MI vs PBKS: सूर्यकुमार यादवची 78 धावांची तुफानी खेळी आणि जसप्रीत बुमराहचा भेदक मारा याच्या जोरावर मुंबईच्या संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली, पण आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर मुंबईने पंजाबचा संपूर्ण संघ बाद करून हा विजय मिळवला. मात्र मुंबई जिंकली असली तरी कर्णधार हार्दिक पांड्यावर BCCIकडून कारवाई करण्यात आली आहे. जाणून घेऊया याबद्दल...

कर्णधार हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने 12 लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स जरी जिंकली असली तरी कर्णधार हार्दिक पांड्याला मात्र कारवाईचा सामना करावा लागला आहे. मुल्लापूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने षटकांची गती कमी राखल्यामुळे आणि षटके वेळेत पूर्ण न केल्यामुळे हार्दिकला कर्णधार म्हणून हा दंड ठोठवण्यात आला आहे.

बीसीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की पंजाब आणि मुंबई सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला दंड ठोठवण्यात आला आहे. षटकांची किमान गतीने न राखल्यामुळे त्याच्यावर बारा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन षटकांनी पिछाडीवर होता. त्यामुळे 19 आणि 20 या दोन षटकांमध्ये त्यांना एक अतिरिक्त फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागला.

ही मुंबई इंडियन्सकडून झालेली षटकांच्या गतीबाबतची पहिली चूक असल्यामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्याला केवळ बारा लाखांचा दंड ठोठवला आहे. पुन्हा अशी चूक घडल्यास हार्दिकचा दंड 24 लाखांपर्यंत जाईल तर संघातील इतर खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्याबीसीसीआयमुंबई इंडियन्स