BCCI SGM Meeting : भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाची ( BCCI) शनिवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याशिवाय या बैठकीत स्थानिक क्रिकेट स्पर्धा व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाबाबतही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामने १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होणार असल्याची चर्चा आहे. यावर बीसीसीआयच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली प्रत्यक्ष या बैठकीला हजर असणार आहे, तर अन्य सदस्य व्हिडीओ कॉलद्वारे सहभागी होतील. WTC Final Final playing conditions : फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार?; ICCची मोठी घोषणा
बीसीसीआय बैठकीचा अजेंडा ( BCCI SGM Meeting Agenda)
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी आयसीसीनं १ आणि २ जूनला बैठक बोलावली आहे. त्याआधी बीसीसीआयची बैठक पार पडणार आहे. बीसीसीआयच्या या बैठकीत आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे प्रमुख मुद्दे आहेत. आयपीएल २०२१चे उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन हे बैठक बोलावण्यामागचं प्रमुक कारण आहे. यूएईत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे सामने होतील. सुरुवातीला हे सामने लंडनमध्ये खेळवण्याचा विचार सुरू होता, परंतु इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल न करण्याची भूमिका घेतली. WTC final playing conditions : ICCच्या नियमावलीनं गोंधळात पडला वासिम जाफर, मुन्नाभाईचं मीम्स केलं पोस्ट
परदेशी खेळाडूंची उपलब्धता
२८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२१चे आयोजन होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल २०२१च्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला या खेळाडूंसाठी चार्टर्ड फ्लाईटचं आयोजन करावं लागेल. रिकॉर्ड तोड कमाई: कोरोनामुळे लोकांचे खायचे वांदे अन् टेनिसपटूनं १२ महिन्यात कमावले ४०२ कोटी!
खेळाडूंचे लसीकरण
यूएईत कोरोनाच्या नियमांचे कठोर पालन केले जाते. त्यामुळे कोरोना लस घेतलेल्या खेळाडूंनाच ते प्रवेश देणार आहेत. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या खेळाडूंचे लसीकरण करून घेतले आहे. पण, त्यांना आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी परदेशी खेळाडूंसह ७०० लोकांचं लसीकरण करावं लागेल. त्यावरही बैठकीत चर्चा होईल.
द्विदेशीय मालिका
आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठीच्या कालावधीत येणाऱ्या दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका बीसीसीआयला स्थगित कराव्या लागतील. बीसीसीआयनं या दोन्ही देशांच्या मंडळांना त्यासाठी तयार केले आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आयोजन
देशातील कोरोना परिस्थिती पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात करायचे की यूएईत ही स्पर्धा खेळवायची यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे.
खेळाडूंच्या प्रवासाची सोय
लंडन येथून भारत व इंग्लंडच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईटनं यूएईत आणण्यात येईल. शिवाय बीसीसीआयला वेस्ट इंडिज येथूनही चार्टर्ड फ्लाईटची सोय करावी लागेल.
स्थानिक क्रिकेटचे काय?
बीसीसीआय या बैठकीत स्थानिक क्रिकेट स्पर्धांबाबदही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Web Title: BCCI SGM Meeting: IPL 2021 Phase 2 fate to be decided on Saturday in the BCCI meeting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.