BCCI Secretary Devajit Saikia On Schedule Of IPL 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2026) चा थरार अनुभवायला मिळणार आहे. क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात २८ मार्चपासून होणार आहे. मात्र कोणत्या दिवशी, कुठे आणि कोणते संघ आमनेसामने असतील याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन टप्प्यात होणार IPL वेळापत्रकाची घोषणा
बीसीसीआय (BCCI) अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी काही राज्यांमधील निवडणुकांच्या तारखांची वाट पाहत आहे. त्यामुळे बोर्डाने टप्प्याटप्प्याने IPL 2026 स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devajit Saikia) यांनी मंगळवारी दिली आहे.
IPL 2026: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! CSK चा माजी धडाकेबाज ओपनर गिलच्या टीमला देणार बॅटिंगचे धडे
२८ मार्चला IPL 2026 स्पर्धेचा बिगुल वाजणार
IPL 2026 हंगामाची अधिकृत सुरुवात २८ मार्चपासून होणार असल्याची पुष्टी अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने केली. ही घोषणा भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आली. एएनआयशी बोलताना देवजित सैकिया म्हणाले की,"काही राज्यांतील निवडणुकांच्या तारखा पाहिल्यानंतर आम्ही २-३ दिवसांत पहिल्या २० दिवसांचे वेळापत्रक जाहीर करू. उर्वरित स्पर्धेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल."
बंगळुरुच्या मैदानात रंगणार फायनल!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा गत चॅम्पियन संघ आहे. १८ वर्षांच्या इतिहासात गत हंगामात त्यांनी पहिली वहिली ट्रॉफी जिंकली होती. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिन संतोष मेनन यांनी बंगळुरुचे घरच्या मैदानातील ५ लढती या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि २ सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्याची पुष्टी केली होती. यावेळी त्यांनी IPL मधील परंपरेनुसार फायनल लढतीसह प्लेऑफ्समधील एक सामना बंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर IPL वेळापत्रकाची घोषणा होण्यास विलंब
पश्चिम बंगाल, केरळ, आसामसह तमिळनाडू राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने त्याआधी निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. त्यामुळेच यंदाच्या IPL स्पर्धेतील वेळापत्रकासह विलंब होत आहे.
Web Summary : IPL 2026 starts March 28th after the T20 World Cup. The schedule will be released in two phases due to state elections. The first 20 days will be announced soon. Bengaluru may host the final.
Web Summary : आईपीएल 2026, टी20 विश्व कप के बाद 28 मार्च से शुरू होगा। राज्य चुनावों के कारण शेड्यूल दो चरणों में जारी किया जाएगा। पहले 20 दिनों की घोषणा जल्द होगी। बेंगलुरु फाइनल की मेजबानी कर सकता है।