मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात धावांची आतषबाजी केली. सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम त्याने या सामन्यात केला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून ते अनेकांनी विराटवर कौतुकाचा वर्षाव केला. पण, बीसीसीआयने 'GOAT' अशी कॅप्शन देत विराटचा फोटो शेअर केला.
'GOAT' म्हणजे काय ? विशाखापट्टणम सामन्यात विराटने ८१वी धाव घेताच वन डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा?? भारतीय फलंदाज ठरला. विराटने या खेळीने तेंडुलकरचाही विक्रम मोडला. विराटने २०५ डावांत दहा हजार धावा केल्या, तर सचिनला २६९ डाव खेळावे लागले. त्यामुळेच
बीसीसीआयने विराटला 'GOAT' असे संबोधले.. GOAT म्हणजे Greatest Off All Time...
चाहत्यांकडून ट्रोलविराटला GOAT संबोधल्यानंतर चाहत्यांकडून बीसीसीआय ट्रोल झाली. विराटचे कौतुक आहेच परंतु GOAT हा सचिन तेंडुलकरच राहणार असे चाहत्यांनी ठणकावले.