Join us

शिखा पांडेची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 23:36 IST

Open in App

पणजी : गोव्याची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिच्या नावाची शिफारस देशातील प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिखा पांडे आणि दिप्ती शर्मा या दोघींची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठविली आहे. असे झाल्यास अर्जुन पुरस्कार मिळवणारी शिखा पांडे ही पहिली महिला गोमंतकीय खेळाडू ठरेल. यापूर्वी पुरुषांमध्ये फुटबॉल या खेळात ब्रम्हानंद शंखवाळकर आणि ब्रुन्हो कुतिन्हो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शिखाने २०१४ मध्ये अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ती भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. महिला क्रिकेटमध्ये शिखाचे महत्वपूर्ण योगदान ठरलेले आहे. गोवा क्रिकेटकडूनही तिने बºयाच राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. गोवा राज्याचा प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य क्रीडा पुरस्कारही तिला मिळालेला आहे. क्रिकेटपटू म्हणून हा पुरस्कार मिळणारी ती एकमेव खेळाडू आहे. शिखाच्या नावाची शिफारस झाल्याची माहिती मिळताच गोवा क्रिकेट संघटनेच्या काही पदाधिकाºयांनी तिचे अभिनंदन करायलाही सुरुवात केली आहे.दरम्यान, शिखा पांडे हिने आतापर्यंत ५२ एकदिवसीय सामन्यात ५०७ धावा आणि ७३ बळी घेतले आहेत. यामध्ये १८ धावांत ४ बळी ही तिची सर्वाेच्य कामगिरी होती. टी-२० क्रिकेटमध्ये शिखाने ५० सामन्यात २०६ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.  गोलंदाजीत तिने ३६ बळी मिळवले आहेत. १४ धावांत ३ बळी ही तिची सर्वाेच्च कामगिरी आहे. झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत विश्वचषकात तिने मुख्य गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडली होती. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघगोवाआंतरराष्ट्रीय क्रिकेट