Join us  

ऑस्ट्रेलियात संघाचा विलगीकरण कालावधी फार अधिक नको, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच मत

गांगुलीने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, ‘आम्ही आॅस्ट्रेलिया दौºयाला मंजुरी दिलेली आहे. आम्ही डिसेंबरमध्ये दौºयावर जाणार आहोत. आम्हाला केवळ विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची आशा आहे.’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:01 AM

Open in App

नवी दिल्ली : यंदा कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारतीय संघासाठी विलगीकरण कालावधी फार जास्त नसावा, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांची इच्छा आहे. कारण खेळाडू एवढा लांबचा प्रवास करून तेथे पोहोचल्यानंतर दोन आठवडे आपल्या हॉटेलच्या रुम्समध्ये बसलेले असावे, हे गांगुलीला पटलेले नाही.गांगुलीने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, ‘आम्ही आॅस्ट्रेलिया दौºयाला मंजुरी दिलेली आहे. आम्ही डिसेंबरमध्ये दौºयावर जाणार आहोत. आम्हाला केवळ विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची आशा आहे.’गांगुली पुढे म्हणाले,‘खेळाडू एवढा लांबचा प्रवास करून गेल्यानंतर दोन आठवडे हॉटेलच्या रुम्समध्ये बसावे, अशी आमची इच्छा नाही. कारण हा कालावधी नैराश्य आणणारा व निराशाजनक असतो. मी सांगितल्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये स्थिती चांगली आहे. मेलबोर्नचा अपवाद वगळता विलगीकरणाचा कालावधी कमी असेल, अशी आशा आहे आणि आम्हाला क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येईल.’ दरम्यान, भारताच्या माजी कर्णधाराने या महामारीदरम्यान बोर्डाचे संचालन करण्यासाठी येत असलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. ते म्हणाले,‘चार महिन्यापासून आम्ही मुंबईतील आपल्या कार्यालयात गेलेलो नाही. बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सात किंवा आठ महिने झाले असून, त्यातील चार महिने कोरोना व्हायरसला अर्पण झालेले आहे.’ त्यांच्या व सचिव जय शाह यांच्या कार्यकाळाच्या विस्तारासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत गांगुली म्हणाले, ‘आमच्या कार्यकाळाला वाढ मिळेल किंवा नाही, याची कल्पना नाही. जर मुदतवाढ मिळाली नाही तर आम्ही पदावर राहणार नाही, मी आणखी काही करेल.’ (वृत्तसंस्था)विराटच्या कराकि र्दीला नवी दिशा मिळेलगांगुली म्हणाले, आॅस्ट्रेलियातील मालिका कर्णधार विराट कोहलीसाठी कारकिर्दीला नवी दिशा देणारी ठरेल. त्यांनी सांगितले की, ‘डिसेंबरपर्यंत मी अध्यक्षपदावर राहील किंवा नाही याची कल्पना नाही, पण कर्णधाराचा हा कार्यकाळ निकष ठरेल. ही मालिका मैलाचा दगड ठरेल. मी कोहलीच्या संपर्कात असून तुला फिट राहावे लागेल, हे सांगत आहे. कारण तो सहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दौºयासाठी सर्वोत्तम गोलंदाज फिट असावेत, हे सुनिश्चित करावे लागेल.’

टॅग्स :सौरभ गांगुली