Join us  

टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी विभागणार? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं मांडलं मत

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या मर्यादित षटकाच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडून काढून घेतली जावी, अशी मागणी जोर धरत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 3:35 PM

Open in App

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या मर्यादित षटकाच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडून काढून घेतली जावी, अशी मागणी जोर धरत होती. ही जबाबदारी रोहित शर्माकडे द्यावी आणि कोहलीकडे केवळ कसोटी संघाचे नेतृत्व असावे, असा मतप्रवाह निर्माण झाला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद उंचावले आहे. त्यामुळे आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहितकडे द्या अशी मागणी आहे. याबाबत बीसीसीआयनं आपलं मत मांडताना तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहलीकडे असेल, असे स्पष्ट केले होते.

पण, आता माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा डोकं वर काढत आहे. याच संदर्भात जेव्हा गांगुलीला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला,''हा मुद्दा आता चर्चिला जाण्याची गरज मला वाटत नाही.'' 

टीम इंडियाच्या पराभवानंतर सौरव गांगुलीनं केलं विधान, म्हणाला...भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य बांगलादेशनं ७ विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद ६० धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. या सामन्यानंतर गांगुलीनं ट्विट केलं. त्यात त्यानं लिहिलं की,''अशा वातावरणातही सामना खेळल्याबद्दल दोन्ही संघांचे आभार. बांगलादेशची कामगिरी कौतुकास्पद झाली.'' 

कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण 

149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्या षटकात धक्का बसला. त्यानंतर मोहम्मद नइम (२६), सौम्या सरकार ( ३९) आणि मुश्फिकर रहीम (६०*) यांनी बांगलादेशचा विजय सूकर केला. ८ प्रयत्नानंतर बांगलादेशचा भारतीय संघावरील पहिलाच विजय ठरला.  या सामन्यानंतर रोहित म्हणाला," बांगलादेशच्या खेळाडूंकडून त्यांचं श्रेय हिसकावून घेणार नाही. आम्ही फलंदाजी करत असताना पडलेल्या महत्त्वाच्या विकेट्स, क्षेत्ररक्षण करताना केलेल्या चूका, DRS घेण्यात झालेल्या चूका, याचा फटका बसला. पण, यातून आम्ही शिकलो आहे." 

 

 

 

टॅग्स :सौरभ गांगुलीविराट कोहलीरोहित शर्माबीसीसीआय