Join us  

Sourav Ganguly : सौरव गांगुलीनं दिला राजीनामा; IPL फ्रँचायझीवरून सुरू झालेल्या वादानंतर घेतला निर्णय

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी दोन नव्या संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 9:25 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे( BCCI)  अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्यावर  conflict of interest  म्हणजेच हितसंबंध जपण्याचा आरोप केला गेला. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी दोन नव्या संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. संजीव गोएंका यांनी लखनौ फ्रँचायझी जिंकल्यानंतर सौरव गांगुली अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्यानं आज हे पाऊल उचलले.

सौरव गांगुलीनं इंडियन सुपर लीगमधील ATK Mohun Bagan क्लबच्या संचालक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. RPSG यांच्याकडे  ATK Mohun Bagan  संघाचे मालकी हक्क आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, व्यावसायिक हर्षवर्धन नियोतिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख यांचा समावेश आहे. त्यामुळे गांगुलीवर हितसंबंध जपण्याचा आरोप होत होता. ''मी राजीनमा दिलाय,''असे गांगुलीनं Cricbuzz या वेबसाईटला सांगितले.  

संजीव गोएंका यांनी दिले होते संकेतसीएनबीसी-टीव्ही१८ सोबतच्या मंगळवारच्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली यांच्यासोबतच्या हितसंबंधांच्या संघर्षाबाबत गोयंका यांनी सांगितले की, मला वाटते सौरव गांगुली मोहन बागानमधून पूर्णपणे बाजूला होणार आहेत. याबाबत अधिक विचारणा केली असता हे सर्व आजच होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र नंतर गोयंका यांनी सौरव गांगुली यांच्यावर आहे की याबाबत कधी निर्णय घ्यावा. मी आधीच याबाबत बोललो त्याबाबत क्षमस्व. सौरव गांगुली फुटबॉल क्लबशी असलेला संबंध संपवला तरी आपीएलमधील संघांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये बीसीसीआयमधील  अध्यक्ष म्हणून त्यांच्या भागीदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.  

टॅग्स :सौरभ गांगुलीआयपीएल २०२१इंडियन सुपर लीग
Open in App