IPL 2026 New Rule : आयपीएल २०२६ स्पर्धेच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने खेळाडू आणि फ्रँचायझी संघांसाठी कठोर नियमावली जाहीर केली होती. आता IPL मॅच दरम्यान शिस्त पाळण्यासाठी यात नव्या कठोर नियमाची भर पडली आहे. नव्या नियमानुसार. बाकावर बसणाऱ्या खेळाडूंना मैदानात जाण्यावर बंदी असेल. सामन्यादरम्यान फक्त तेच १६ खेळाडू मैदानावर ये-जा करू शकतील, ज्यांचा समावेश टीम मॅनेजमेंटने अधिकृत टीम शीटमध्ये केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाउंड्री लाईनवर फक्त पाच खेळाडूंना परवानगी
BCCI आणि IPL व्यवस्थापनाने संघांना निर्देश दिले आहेत की, १६ खेळाडूंमध्ये नसलेले खेळाडू कोणत्याही परिस्थितीत मैदानावर जाणार नाहीत. ड्रिंक्स देण्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी या खेळाडूंना मैदानात जाण्याची परवानगी नसेल. नव्या नियमांनुसार एका वेळी फक्त संघातील पाच खेळाडूंनाच बाउंड्री लाईनजवळ थांबण्याची मुभा असेल.
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
उर्वरित खेळाडू डगआउटपुरते मर्यादित
क्रिकबझने IPL फ्रँचायझीच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, इतर खेळाडूंना आता डगआउटमध्येच बसावे लागेल. त्यांना बाउंड्री लाईन आणि LED जाहिरात फलकांच्या दरम्यान फिरण्याची परवानगी नसेल. यापूर्वी नियमांमध्ये काही प्रमाणात सवलत होती, जिथे खेळाडू खेळात अडथळा न आणता ड्रिंक्स घेऊन मैदानात जाऊ शकत होते. मात्र आता BCCI ने मॅच प्लेइंग कंडिशन्स (MPC) मधील क्लॉज ११.५.२ आणि २४.१.४ अधिक कडक करत स्पष्ट बंदी घातली आहे.
हा निर्णय का घेतला?
या नव्या नियमामागचे अचूक कारण स्पष्ट झालेले नसले तरी, सामन्यादरम्यान शिस्त राखण्यासाठी आणि अनावश्यक हालचाल टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. लखनौ सुपर जाएंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान पंतने मारलेला विजय चौकारानंतर एक वाद निर्माण झाला होता. आवेश खानने चेंडू सीमापार होण्याआधीच तो बॅटने टोलावला होता. त्याची ही कृती देखील यामागचं कारण असू शकते.