सामन्याच्या दिवशी होणार नाही सराव; IPL 2026 साठी BCCI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, नियम जाहीर

खेळाडूंची सामना सुरू होण्याआधी फिटनेस टेस्ट घेतली जाणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:34 IST2026-03-24T10:34:35+5:302026-03-24T10:34:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
bcci new guidelines and rules for IPL 2026 there will be no practice on match day | सामन्याच्या दिवशी होणार नाही सराव; IPL 2026 साठी BCCI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, नियम जाहीर

सामन्याच्या दिवशी होणार नाही सराव; IPL 2026 साठी BCCI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, नियम जाहीर

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने सोमवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम जाहीर केले. यानुसार सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला सराव करता येणार नाही. खेळाडूंची सामना सुरू होण्याआधी फिटनेस टेस्ट घेतली जाणार नाही.
 
जर्सी नंबर बदलायचा असल्यास किमान २४ तास आधी माहिती देणे बंधनकारक असेल आणि ड्रेसिंग रूममध्ये फक्त स्टाफलाच प्रवेश दिला जाईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघांसाठी स्वतंत्र सराव व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला वेगवेगळे विकेट दिले जातील. 

कोणताही संघ विरोधी संघाच्या विकेटचा वापर करू शकणार नाही. प्रत्येक संघाला सराव क्षेत्रात दोन नेट्स आणि मुख्य स्क्वेअरवर एक साइड विकेट दिली जाईल.

मुंबईत जर दोन्ही संघ एकाच वेळी सराव करीत असतील, तर त्यांना प्रत्येकी दोन विकेट दिल्या जातील. ओपन नेट्सना परवानगी नसेल. एखादा संघ आपला सराव लवकर पूर्ण करीत असेल, तरी दुसऱ्या संघाला त्यांच्या विकेटचा वापर करता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे सामन्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा सराव पूर्णपणे बंद असेल.

फिटनेस टेस्ट होणार नाही

सामन्याच्या दिवशी मुख्य स्क्वेअरवर कोणत्याही प्रकारची फिटनेस टेस्ट होणार नाही. खेळाडूंना सरावासाठी टीम बसनेच यावे लागेल, मात्र आवश्यक असल्यास त्यांना दोन गटांमध्ये आणले जाऊ शकते. कुटुंबीय आणि मित्र वेगळ्या वाहनाने येतील. 

फक्त हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातूनच सराव पाहू शकतील. ड्रेसिंग रूम व मैदानावर फक्त अधिकृत स्टाफलाच प्रवेश असेल. अधिकृत स्टाफसाठी ॲक्रेडिटेशन कार्ड  आवश्यक असेल. खेळाडूंच्या जर्सी नंबरमध्ये बदल करण्याआधी किमान २४ तास आधी माहिती द्यावी लागेल.
 

Web Title : मैच के दिन अभ्यास नहीं: बीसीसीआई के नए आईपीएल 2026 नियम।

Web Summary : बीसीसीआई के नए आईपीएल 2026 दिशानिर्देश मैच के दिनों में अभ्यास को प्रतिबंधित करते हैं। जर्सी नंबर बदलने के लिए 24 घंटे का नोटिस आवश्यक है। ड्रेसिंग रूम में केवल अधिकृत कर्मचारियों को अनुमति है। नामित विकेटों के साथ अलग अभ्यास सुविधाएं प्रदान की जाती हैं। मुख्य मैदान पर फिटनेस टेस्ट भी प्रतिबंधित हैं।

Web Title : No practice on match day: BCCI's new IPL 2026 rules.

Web Summary : BCCI's new IPL 2026 guidelines prohibit practice on match days. Jersey number changes require 24-hour notice. Only authorized staff allowed in dressing rooms. Separate practice facilities with designated wickets provided. Fitness tests on the main square are also restricted.