Join us  

सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या घटनेत महत्त्वाच्या बदल करण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:02 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या घटनेत महत्त्वाच्या बदल करण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या बदलानंतर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना तीन वर्ष पदांवर कायम राहता येणार आहे. सध्याच्या नियमानुसार राज्य संघटना किंवा बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर दोन टर्म पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला 3 वर्षांच्या कुलिंग-ऑफ पीरेडवर जाणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे गांगुली आणि शाह यांनाही कुलिंग-ऑफ पीरेडवर जावं लागणार आहे. पण, बीसीसीआयनं लोढा समितिनं सुचवलेल्या या शिफारशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बीसीसीआयच्या 1 डिसेंबरला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या बदलाला मान्यता दिली होती आणि आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. सध्याच्या नियमानुसार गांगुली आणि शाह यांना अनुक्रमे जुलै व जून महिन्यापासून तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या कोणत्याही कामात सहभाग घेता येणार नाही. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांची बिनविरोध निवड झाली होती.बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत केवळ अध्यक्ष व सचिव यांच्यासाठी कुलिंग पीरेडच्या घटनेत बदल करण्याचे मान्य झाले आहे.

गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशन, तर शाह गुजरात क्रिकटे असोसिएशनमध्ये कार्यरत होते. याशिवाय बीसीसीआयनं सदस्याच्या अपात्र नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा नोंद असेल किंवा त्यानं तीन ते चार वर्ष कारावासाची शिक्षा पूर्ण केली असेल, अशा व्यक्तीला बीसीसीआयचं सदस्य बनता येणार नाही. बीसीसीआयचा कार्यभार हाताळण्यासाठी हा नियम आवश्यक असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

स्पर्धात्मक क्रिकेट मान्सूननंतरच शक्य- सीईओ राहुल जोहरीयंदा इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाबाबत बीसीसीआय आशावादी असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी गुरुवारी दिली. मान्सून आटोपल्यानंतरच स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात होऊ शकेल, असेही ते म्हणाले. खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असून कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकालावधीत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा निर्णय खेळाडूंवर सोपवावा लागेल, असा पुनरुच्चारदेखील जोहरी यांनी केला आहे.

‘टष्ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ मीडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये जोहरी म्हणाले, ‘२५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे. गेल्या वर्षी देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जितक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा आस्वाद घेतला. प्रायोजकांसाठी क्रिकेट हाच नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. जगभरातील खेळाडू लीगमध्ये खेळतात, हीच आयपीएलची मजा आहे. आयोजनाचे हे महत्त्व टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोरोनातून जगाला आणि देशाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल यात वादच नाही. ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नक्कीच नाही.’ 

चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय