Join us  

बीसीसीआय करणार पाकिस्तानची नाचक्की, नक्की काय करणार ते जाणून घ्या...

बीसीसीआय पाकिस्तानवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली स्थान कसे डळमळीत करता येईल, याचा विचार बीसीसीआयने सुरु केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 3:29 PM

Open in App

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर खेळू नये, असा सूर आवळला जात होता. आगामी विश्वाचषकातही भारताने पाकिस्तानशी दोन हात करू नये, असे म्हटले जात होते. बीसीसीआयनेआयसीसीला याबाबत आपले म्हणणेही स्पष्ट केले आहे. पण बीसीसीआय त्यावर थांबलेली नाही. कारण पाकिस्तानची नाचक्की करण्याचा प्लॅन आता बीसीसीआयने आखला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, बीसीसीआय पाकिस्तानवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली स्थान कसे डळमळीत करता येईल, याचा विचार बीसीसीआयने सुरु केला आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लीग क्रिकेट वर्तुळामध्ये खेळल्या जातात. हा धागा पकडत बीसीसीआयने एक चांगली युक्ती शोधून काढली आहे.

बीसीसीआय पाकिस्तानची नाचक्की कशी करणारबीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्य विनोद राय, डायना एडुल्जी, लेफ्टनंट जनरल रवि थोडगे आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यामध्ये याबाबत एक बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लीगमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभाग घेतात. पण आता जर परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर त्यांना पीएसएल खेळता येणार नाही. पीएसएल खेळणाऱ्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये प्रवेश दिला जाणा नाही, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

पीएसएलमध्ये सध्या ड्वेन ब्राव्हो, सुनील नरीन, आंद्रे रसेल और ए बी डि'विलियर्स खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने जर नवीन निर्णय लागू केला, तर या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर पीएसएल सोडावी लागेल. 

भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम

भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर भारताच्या खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला कुर्निसात केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने, " भारतीय हवाई दलाला सलाम, शानदार..." असे ट्विट केले आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने ही याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चहल म्हणाला की, " Indian Air Force, Bohot Hard Bohot Hard. "

भारताची फुलराणी सायना नेहवालनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सायना म्हणाली की, "Big salute to our #IndianAirForce 🙏🇮🇳.... #IndiaStrikesBack .. Jai Hind. " भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये श्रीकांतने, " Hats off to the #IndianAirForce for their strike against terror. Every Indian is proud of you! Jai Hind!" असे म्हटले आहे. 

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीपुलवामा दहशतवादी हल्ला