IPL 2026 Auction BCCI Last Minute Change Total 369 Players Set To Go Under Hammer Abu Dhabi : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी संघ बांधणी करण्यासाठी अबू धाबी येथे मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. १६ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाआधी बीसीसीआयने अखेरच्या क्षणी अंतिम यादीत मोठा बदल केला आहे. याआधी १००० हून अधिक खेळाडूंमधून लिलावासाठी ३५० खेळाडूंच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. यात २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यात आता नव्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!BCCI नं लिलाव यादीत नेमका काय बदल केला?
बीसीसीआयने ऑक्शनआधी काही नवीन खेळाडूंना अंतिम यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे अबू धाबीत होणाऱ्या लिलावात आता एकूण ३६९ खेळाडू लिलावात सहभागी झाल्याचे पाहायला मिळेल. यात २५३ भारतीयांसह ११६ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मिनी लिलावात १० फ्रँचायझी संघ एकूण ७७ रिक्त जागा भरण्यासाठी लिलावात उतरतील. यात ३१ परदेशी खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत.
BCCI नं टीम इंडियातून डावलण्यात आलेल्या खेळाडूलाही दिली संधी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय कसोटी संघासोबत ठेवून ज्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नाही त्या अभिमन्यु ईश्वरन याच्या नावाचाही समावेश बीसीसीआने अंतिम यादीत केला आहे. याशिवाय मणि शंकर मुरा सिंह (TCA), वीरनदीप सिंह (मलेशिया), चामा मिलिंद (HYCA), के.एल. श्रीजीत (KSCA), एथन बॉश (दक्षिण आफ्रिका), क्रिस ग्रीन (ऑस्ट्रेलिया), स्वास्तिक चिकारा (UPCA), राहुल राज नामला (CAU), विराट सिंह (JSCA), त्रिपुरेश सिंग (MPCA), काइल व्हेरेन (दक्षिण आफ्रिका), ब्लेसिंग मुजाराबानी (झिम्बाब्वे), बेन सियर्स (न्यूझीलंड), राजेश मोहंती (OCA), स्वास्तिक सामल (OCA), सारांश जैन (MPCA), सूरज संगाराजू (ACA) आणि तन्मय अग्रवाल (HYCA) या खेळाडूंच्या नावाचा समावेश लिलावासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम यादीत नव्याने करण्यात आला आहे.
२ फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये आहे तगडी रक्कम
आयपीएलमधील तीन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मिनी लिलावात सर्वाधिक पैसा बाळगून आहे. ते ६४. ३ कोटी एवढ्या रक्कमेसह लिलावात उतरणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ पाचवेळचा चॅम्पियन संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीकडे ४३.४० कोटी एवढी रक्कम आहे.
Web Summary : BCCI altered the IPL 2026 auction list at the last minute, increasing the number of players to 369, including 253 Indians and 116 foreign players. Abhimanyu Easwaran, previously unselected for Team India, is now included. KKR has the largest purse.
Web Summary : बीसीसीआई ने आईपीएल 2026 की नीलामी सूची में अंतिम समय में बदलाव किया, जिसमें खिलाड़ियों की संख्या बढ़कर 369 हो गई, जिसमें 253 भारतीय और 116 विदेशी खिलाड़ी शामिल हैं। अभिमन्यु ईश्वरन, जिन्हें पहले टीम इंडिया के लिए नहीं चुना गया था, अब शामिल हैं। केकेआर के पास सबसे बड़ा पर्स है।