Join us

एका वर्षात दोनवेळा IPL खेळवण्याचा BCCI चा मेगा प्लान; अरुण धुमाळ यांनी दिले अपडेट्स 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:17 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होणार आहे.   भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एका कॅलेंडर वर्षात दोन इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगाम आयोजित करण्याची शक्यता तपासत आहे.  ही संकल्पना यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडली होती, ज्यांनी द्विपक्षीय क्रिकेटमधील संभाव्य घट लक्षात घेता वर्षाच्या उत्तरार्धात आयपीएलच्या दोन हंगामाची कल्पना मांडली होती.  

एका वर्षात दुसऱ्या आयपीएल हंगामासाठी कॅलेंडर वर्षात विंडो मिळणे महत्त्वाचे आहे आणि हाच मोठा अडथळा आहे. आयसीसीच्या स्पर्धांनी वर्षाचे कॅलेंडर व्यग्र आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या चर्चांना दुजोरा दिला आणि काही उपाय शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. “आम्हाला ८४ सामन्यांसाठी आणि त्यानंतर ९४ साठी विंडो शोधण्याची गरज आहे,” असे त्यांनी टेलिग्राफला सांगितले. अतिरिक्त हंगामाचा या खेळाला फायदा होईल यावर त्यांनी भर दिला.

टी १० की टी २०?दुसऱ्या सीझनची शक्यता तपासली जात असताना हा फॉरमॅट ट्वेंटी-२०  किंवा टी १० फॉरमॅटमध्ये खेळवायचा हे अनिर्णित आहे. अरुण धुमाळ यांनी सांगितले की टी १० फॉरमॅटबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि भविष्यातील कोणतेही निर्णय खेळाच्या हितासाठीच घेतले जातील. अरुण धुमाळ यांनी यावर भर दिला की BCCI चाहत्यांच्या सहभागाला आणि मनोरंजन मूल्याला प्राधान्य देते. आयपीएलच्या यशामागे चाहत्यांची प्रेरणा आहे, असे ते मानतात.  दक्षिण आफ्रिका, UAE आणि वेस्ट इंडीजमधील ट्वेंटी-२० लीगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय फ्रँचायझींच्या वाढत्या ट्रेंडमुळे BCCI धोक्यात आलेला नाही. जागतिक स्तरावर द्विपक्षीय क्रिकेटच्या घसरत्या मीडिया हक्कांच्या मूल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे धुमाळ यांचे मत आहे. आयपीएलच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा आणि आर्थिक नुकसान भरून काढण्याचा या देशांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :आयपीएल २०२३बीसीसीआय