Women's IPL teams auction: महिला IPL लिलावाने BCCI होणार मालामाल; तिजोरीत 4 हजार कोटींची पडणार भर?

ipl auction 2023: महिला आयपीएल आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 12:22 IST2023-01-24T12:21:54+5:302023-01-24T12:22:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI is expected to fetch Rs 4 thousand crore in the women's IPL team auction   | Women's IPL teams auction: महिला IPL लिलावाने BCCI होणार मालामाल; तिजोरीत 4 हजार कोटींची पडणार भर?

Women's IPL teams auction: महिला IPL लिलावाने BCCI होणार मालामाल; तिजोरीत 4 हजार कोटींची पडणार भर?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) बुधवारी (25 जानेवारी) होणाऱ्या महिला आयपीएलच्या (WIPL) 5 संघांच्या लिलावातून किमान 4000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. देशातील मोठे उद्योगपती यामध्ये बोली लावणार आहेत. जाणकारांच्या मते, संघांच्या लिलावात प्रत्येक संघ 500 ते 600 कोटी रुपयांना विकला जाण्याची शक्यता आहे. याआधी पुरुषांच्या आयपीएल संघांच्या लिलावात काम केलेल्या एका व्यक्तीने लिलावापूर्वी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "महिला आयपीएलमध्ये भरपूर क्षमता आहे. काही बोलींची किंमत 500 कोटी किंवा त्याहून अधिक असू शकते. 800 कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता कमी आहे." 

दरम्यान, महिला आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी 30 हून अधिक कंपन्यांनी 5 कोटी रुपयांची बोली कागदपत्रे खरेदी केली आहेत. यामध्ये पुरुषांच्या आयपीएल संघांच्या मालकीच्या 10 कंपन्यांचा समावेश आहे. अदानी ग्रुप, टोरेंट ग्रुप, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांनीही संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे. यामध्ये 2021 मध्ये दोन नवीन पुरुष IPL संघ खरेदी करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांचाही समावेश आहे. तसेच पुरूष IPL संघांपैकी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ खरेदी करण्यात अधिक रस दाखवू शकतात. कारण या फ्रँचायझींनी जागतिक स्तरावर देखील संघ खरेदी केले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, व्यावसायिक घराणे संघ खरेदी करण्यासाठी दोन तत्त्वांवर बोली लावतात. यापैकी पहिला गुंतवणुकीवर परतावा आहे, जो कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत सिद्धांत मानला जातो. दुसरे म्हणजे व्यवसायाचे तत्व नाही. बोलीशी संबंधित आयपीएल फ्रँचायझीच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, "समजा एखाद्या फ्रँचायझीने पाच वर्षांसाठी 500 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली, तर ती दरवर्षी 100 कोटी रुपये होईल." 

मुंबईत रंगणार महिला IPLचा थरार
महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा थरार मुंबईत रंगणार आहे. बीसीसीआयची विविध बाजूंनी तिजोरी भरणार आहे. खरं तर बीसीसीआय त्यांच्या माध्यम प्रसारण अधिकारांचे उत्पन्न शेअर करते जे कमाईचे मुख्य स्त्रोत आहे. पाच संघांच्या महिला आयपीएलची स्पर्धा मार्चमध्ये मुंबईत खेळवली जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: BCCI is expected to fetch Rs 4 thousand crore in the women's IPL team auction  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.