भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञान प्रमुख या तीन पदांसाठी जाहिरात दिली आहे. ही भरती बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी असेल. या नोकरीसाठी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
ऑस्ट्रेलियाचा माजी प्रथम श्रेणी वेगवान गोलंदाज ट्रॉय कूली यांची २०२१ मध्ये एनसीएचा गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. ट्रॉय कूली यांचा कार्यकाळ संपला असून त्यांची जागा भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्हीआरव्ही सिंग घेण्याची शक्यता आहे. वैद्यकीय संघाचे प्रमुख नितीन पटेल यांच्यासह अनेक स्टाफ सदस्यांच्या जाण्यानंतर अनेक पदे रिक्त आहेत. पटेल यांनी मार्चमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनीही राजीनामा दिला असून आता ते राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत.
एनसीएचे आणखी एक प्रशिक्षक सीतांशू कोटक राष्ट्रीय संघात सामील झाले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा सीओई प्रमुख म्हणून कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपत आहे आणि त्यांना तो वाढवायचा नसल्याचे समजते. परंतु, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत त्यांना या पदावर राहण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या पात्रता
बीसीसीआयने आपल्या जाहिरातीत असे म्हटले आहे की, फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी उमेदवार हा माजी प्रथम श्रेणी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असावा, ज्याच्याकडे बीसीसीआय पातळी दोन किंवा तीन प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे. फलंदाजी प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक या पदांसाठी राज्य किंवा उच्चभ्रू युवा स्तरावर किमान पाच वर्षांचा प्रशिक्षण अनुभव आवश्यक आहे. क्रीडा विज्ञान प्रमुख पदासाठी उमेदवाराकडे क्रीडा विज्ञान किंवा संबंधित विषयात मास्टर्स आणि किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Web Title: BCCI invites applications for Head of Sports Science and Medicine at CoE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.