Join us  

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवाती त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 3:24 PM

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवाती त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. 2017 मध्ये विराट-अनुष्कानं इटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या चर्चा अनेकदा उठल्या. पण, आज दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या घरी पाहूणा येणार असल्याचे जाहीर केले. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. विराटनं ही गोड बातमी दिल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) यांनी दिलेल्या शुभेच्छा हटके ठरल्या.   

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहलीविरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्काआयसीसीबीसीसीआय