Join us  

Breaking: बीसीसीआयचं ठरलं; IPL 2020ची फायनल 10 नोव्हेंबरला, 10 डबल हेडर सामने!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठीची आज महत्त्वाची बैठक पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 8:19 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात आयपीएलची तारीख ठरवरण्यात आली असून डबल हेडर आणि सामन्यांची वेळही ठरवण्यात आली. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आधीच जाहीर केले होते. ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार होती, परंतु अंतिम सामन्याच्या तारखेवरून थोडा गोंधळ होता तोही आज सुटला.

गव्हर्निंग काऊंसिलच्या आज झालेल्या बैठकीत 19 सप्टेंबरला ही स्पर्धा सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. 53 दिवसांच्या कालावधीत 10 डबल हेडर सामने रंगणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे.

IANS शी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,'' 10 नोव्हेंबरपर्यंतच स्पर्धा खेळवण्याचे आम्ही ठरवले आहे आणि त्यामुळे 10 नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मंगळवारी आयपीएल फायनल खेळवली जाईल. दोन सामन्यांमध्ये पुरेसा गॅप असावा याची काळजी आम्ही घेतली आहे. प्रवासाचा वेळ, जैव सुरक्षितता वातावरण आणि अऩ्य काही गोष्टी डोक्यात ठेवून 10 डबल हेडर सामने खेळवण्याचे ठरले आहे.''

''आयपीएलचा सामना 30 मिनिटे आधी खेळवण्याचे ठरले आहे आणि त्यामुळे सामने 7.30 वाजता खेळवण्यात येतील. सामना पाहण्यासाठी प्रेक्षक असते तर खेळाडूंचा उत्साह वाढला असता, परंतु खेळाडूंची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे या गोष्टींवर वेळ आल्यावर अमिराती क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली जाईल,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले.  

फ्रँचायझींना व्हिसाची प्रोसेस सुरू करण्यास सांगितले आहे. ''क्रीडा मंत्रालयाकडून बीसीसीआयला मान्यता मिळालेली आहे आणि अन्य विभागाकडून लवकरच सकारात्मक उत्तर मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!

मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत

कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा

हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!

IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल

भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो

रोहित शर्माला मिळालेलं पहिलं मानधन किती होतं? 2020मध्ये 124 कोटी नेट वर्थ असलेल्या हिटमॅननं दिलं उत्तर

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय