भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो

प्रेमासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही... आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि त्यांची प्रेमकथा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे.

आता हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ईदच्या निमित्तानं त्याच्या पत्नीला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आला आहे.

2014च्या भारताविरुद्धचा मिरपूर वन डे सामन्यादरम्यान त्यानं पत्नीची छेडछाड करणाऱ्या इसमाला चोपले होते.

मॅच फिक्सिंगसाठी बुकीनं संपर्क साधल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) दिली नसल्यानं सध्या त्याच्यावर बंदी घातली गेली आहे.

दोन वर्षांची बंदी 29 ऑक्टोबर 2020मध्ये संपुष्टात येणार आहे आणि तो इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतो.

लंडनमध्ये 2010साली कौंटी क्रिकेट स्पर्धेदरम्यान हा क्रिकेटपटू शिशीर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला.

शिशीर ही लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. भेटीनंतर दोघ एकमेकांना आवडू लागले.

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन यानं ही महागडी मर्सडीज बेन्ज त्याच्या पत्नीला गिफ्ट दिली आहे.

दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शकिब व शिशीर यांनी 2012मध्ये लग्न केलं. तीन वर्षानंतर या जोडीला कन्यारत्न प्राप्ती झाली आणि 2020मध्ये त्यांना आणखी एक कन्या झाली

शकिबनं 56 कसोटी, 206 वन डे आणि 76 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे.