नवी दिल्ली : राहुल जौहरी यांची लैंगिक शोषणाविरोधातील आरोपांवर उत्तर देण्याची वेळ संपली आहे. मात्र त्यांच्यावरील आरोपांची स्वतंत्र पॅनलकडून चौकशी व्हावी, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
जौहरी यांनी आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिले की नाही, याबाबत अजून अस्पष्टता आहे. वकील करिना कृपलानी यांनी सांगितले, की हा एक कायदेशीर प्रश्न आहे आणि त्यावर मी टिपणी करू शकत नाही.’ एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले, ‘मला याबाबत माहिती हवी आहे की सीओए आपल्या तपासात पारदर्शकता का आणत नाही. हे गंभीर आरोप आहेत.’