Join us

बीसीसीआयने माझ्यावर अन्याय केला; ' या ' खेळाडूने केला गंभीर आरोप

पूर्ण वर्षभरात मी देवधर आणि विजय हजारे या स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धांमध्ये माझी धावांची सरासरी शंभर धावांची आहे. पण तरीही बीसीसीआयने मला भारताकडून खेळण्याची संधी दिलेली नाही, असे अन्याय झालेल्या क्रिकेटपटूने सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:25 IST

Open in App
ठळक मुद्देया आरोपांवर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नवी दिल्ली : स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यावर राष्ट्रीय संघात स्थान दिले जाते, असे म्हटले जाते. पण एका खळाडूने आपण चांगली कामगिरी केल्यावरही बीसीसीआयने आपल्यावर अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आरोप करणाऱ्या खेळाडूचे म्हणण आहे की, " पूर्ण वर्षभरात मी देवधर आणि विजय हजारे या स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धांमध्ये माझी धावांची सरासरी शंभर धावांची आहे. पण तरीही बीसीसीआयने मला भारताकडून खेळण्याची संधी दिलेली नाही. माझ्यावर झालेला हा मोठा अन्याय आहे. "

बंगालकडून खेळताना मनोज तिवारीने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यावरही त्याला भारतीय संघातून डावण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून मनोजने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. मनोजने केलेल्या आरोपांवर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेट