Join us  

मोठी घोषणा: कोरोना लढ्यात BCCIचा मदतीचा हात, विराट कोहलीच्या संघाकडून ४५ कोटींचा हातभार!

देशात मागील २४ तासांत २ लाख २२,३१५ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३ लाख २,५४४ रुग्ण ब रे झाले. ४४५४ रुग्णांना मागील २४ तासांत प्राण गमवावे लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:27 PM

Open in App

देशात मागील २४ तासांत २ लाख २२,३१५ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३ लाख २,५४४ रुग्ण ब रे झाले. ४४५४ रुग्णांना मागील २४ तासांत प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण २ कोटी ६७ लाख ५२,४४७ कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी २ कोटी, ३७ लाख २८,०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ३७२० रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.  आतापर्यंत १९ कोटी ६० लाख ५१,९६२ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारताच्या या कोरोना लढ्यात BCCIनंही मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयनं सोमवारी सोशल मीडियावरून मोठी घोषणा केली. भारताच्या कोरोना लढ्यासाठी बीसीसीआयनं १० लिटरच्या २००० ऑक्सिजन संच दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ( BCCI on Monday announced that it will contribute 10-Litre 2000 Oxygen concentrators to boost India’s efforts in overcoming the COVID-19 pandemic)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला जागोजागी दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटं समोर असताना नवे संकट उभे राहिले आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला,''कोरोनाशी आरोग्य विभाग दिवसरात्र लढा देत आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या कामाला सलाम करते. बीसीसीआयनंही नेहमी आरोग्य व सुरक्षा याला प्राधान्य दिले आहे. या ऑक्सिजन संच या फ्रंटलाईन वर्कर्सना मदतच मिळेल आणि लोकं लवकरात लवकर बरी होतील.'' बाबो; विराट कोहली नव्हे तर 'हा' कर्णधार घेतो सर्वाधिक पगार; पाकिस्तानचा बाबर आझम अजूही खेळतोय लाखांतच!

''कोरोनाशी आपण खांद्याला खांदा लावून लढायला हवं. देशातील आरोग्य यंत्रणेला या वैद्यकिय उपकरणांची गरज आहे आणि बीसीसीआयला याची जाण आहे, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आशा करतो की त्यातून यांना मदतच मिळेल,''असे सचिव जय शाह यांनी सांगितले. सफा बेग अन् इरफान पठाणचा जुना फोटो व्हायरल; जाणून घ्या कोण आहे ही सुंदरी!

 

दरम्यान, RCBची पॅरेंट कंपनी Diageo यांनीही या लढ्यात ४५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. प्रत्येक राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील एका जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. 

टॅग्स :बीसीसीआयरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोरोना वायरस बातम्या