बाबो; विराट कोहली नव्हे तर 'हा' कर्णधार घेतो सर्वाधिक पगार; पाकिस्तानचा बाबर आझम अजूही खेळतोय लाखांतच!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. ज्या क्रिकेटपटूंमुळे ही संघटना श्रीमंत झाली, त्यांनाही छप्परफाड पगार दिला जातोच.. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा फोर्ब्स लिस्टमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप टेन खेळाडूंमध्ये असलेला एकमेव क्रिकेटपटू आहे. बीसीसीआयच्या करारानुसार त्याला वर्षाला 7 कोटी पगार दिला जातो. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट अव्वल स्थानी नाही, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. ( List of highest paid international captains)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट अव्वल स्थानी नाही, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. ( List of highest paid international captains)

श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला ५१ लाख, तर ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार कुसल परेरा याला २५ लाख पगार मिळतो.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला वर्षाला ६२.४ लाख इतकाच पगार मिळतो.

वेस्ट इंडिज संघाचा ट्वेंटी-२० व वन डे संघाचा कर्णधार किरॉन पोलार्ड याला १.७३ कोटी पगार मिळतो. कसोटी संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटला १.३९ कोटी पगार मिळतो.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं त्याच्या नेतृत्वाखाली संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठून दिले आहे. पण, त्याला वर्षाला १.७७ कोटी इतकाच पगार मिळतो.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची हालत खराब आहे. पण, या संघाच्या कर्णधारालाही चांगला पैसा मिळतो. कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गर याला ३.२ कोटी, तर वन डे व ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा यांना २.५ कोटी पगार मिळतो.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि अॅरोन फिंच या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून प्रत्येकी ४.८७ कोटी रुपये मिळतात. टीम पेन कसोटी, तर फिंच ट्वेंटी-२० व वन डे संघाचा कर्णधार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या क्रमांकात दुसऱ्या स्थानी आहे. बीसीसीआयनं त्याचा A+ गटात समावेश केला आहे आणि त्याला वर्षाला ७ कोटी पगार मिळतो. विशेष म्हणजे विराट कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० या तीनही फॉरमॅटमध्ये नेतृत्व सांभाळतो.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) हा या यादीत अव्वल स्थानावार आहे. भारतीय रकमेनुसार जो रूटला वर्षाला ८.९ कोटी रक्कम मिळतात. इंग्लंड क्रिकेट मंडळ कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व देतात आणि त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधाराला ते अधिक पगार देतात. तेच इंग्लंडच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याला १.७५ कोटी पगार मिळतो.