Join us

बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

बीसीसीआयने केंद्रीय करारातून शार्दुल ठाकूरचे नाव वगळल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:58 IST

Open in App

भारतीय नियामक क्रिकेट मंडळ म्हणजेच बीसीसीआयने नुकतीच केंद्रीय वार्षिक कराराची यादी जाहीर केली. यावेळी एकूण ३४ खेळाडूंना बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळविण्यात यश आले, ज्यात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. तर, अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बीसीसीआयने करारमुक्त केलेल्या खेळाडूंच्या यादीत शार्दुल ठाकूर हे सर्वात मोठे नाव आहे

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांसारख्या अनुभवी खेळाडूंना ग्रेड A+ मध्ये समाविष्ट करण्यात आले. मात्र, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, केएस भरत, आवेश खान, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विदावथ कवेरप्पा यांना करारातून मुक्त करण्यात आले.

शार्दुल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेरशार्दुल ठाकूर गणना जगभरातील उत्कृष्ट ऑलराऊंडरमध्ये केली जाते. शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतही शार्दुलला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर शार्दुल ठाकूर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संघाचा भाग नव्हता. नुकतीच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने गोलंदाजीसह फलंदाजीनेही धुमाकूळ घातला. परंतु, देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात फरक आहे.

पर्पल कॅपच्या यादीत टॉप- ५ मध्येआयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूरला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. परंतु, लखनौच्या संघाने शार्दूलवर विश्वास दाखवून त्याचा संघात समावेश केला. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले. आयपीएल २०२५ च्या पर्पल कॅपच्या यादीत तो टॉप ५ मध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दशार्दुल ठाकूरने ११ कसोटी, ४७ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३१ विकेट्स आणि ३३१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६५ विकेट्स आणि ३२९ धावा आहेत. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३३ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६९ धावा केल्या आहेत.  

बीसीसीआयच्या केंद्रीय करारांची संपूर्ण यादी:

ग्रेड A+: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.ग्रेड A: मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.ग्रेड B: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर.ग्रेड C: रिंकू सिंह, टिळक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप संग, प्रसीद कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक, दीप्ती शर्मा, अभिषेक शर्मा, हरीश कुमार, अभिषेक शर्मा.

टॅग्स :बीसीसीआयशार्दुल ठाकूर