Join us  

BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade 

आयपीएलचा (IPL 2021) मोसम सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 9:53 PM

Open in App

आयपीएलचा (IPL 2021) मोसम सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयनं संघाच्या खेळाडूंच्या करारासाठी चार ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंतसाठीचा बीसीसीआयची ही रिटेनरशिप असणार आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वात अव्वल म्हणजेच 'ए प्लस' ग्रेड देण्यात आली आहे. 'ए प्लस ग्रेड'च्या खेळाडूंना वार्षिक ७ कोटींचं मानधन मिळणार आहे. (BCCI Central Contracts Virat Rohit Bumrah remain in top bracket Pandya promoted to grade A)

आर.अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांचा 'ए ग्रेड'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 'ए ग्रेड'मधील खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे. 

वृद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांना बी ग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. या खेळाडूंना प्रत्येक ३ कोटी रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे. तर वार्षिक १ कोटींच्या मानधन देण्यात येणाऱ्या 'सी ग्रेड'मध्ये कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पंड्याचं यंदा बी ग्रेडमधून ए ग्रेडमध्ये प्रमोशन झालं आहे. तर शार्दुल ठाकूरचं सी ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये प्रमोशन झालं आहे. 

कुणाचं झालं नुकसान?भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव यांचं यंदाच्या करारामध्ये नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. भुवनेश्वर कुमारला ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये टाकण्यात आलं आहे. तर कुलदीप यादव याला बी ग्रेडमधून थेट सी ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे. यजुवेंद्र चहलचंही नुकसान झालं आहे. चहलला बी ग्रेडमधून सी ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे.  

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीजसप्रित बुमराहरोहित शर्मा