BCCI Breaks Silence On India vs Pakistan Match Asia Cup T20 2025 : आशिया चषक २०२५ स्पर्धेचे यजमानपद हे भारताकडे असले तरी टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणारी आशियाई देशांतील प्रतिष्ठीत अन् लोकप्रिय स्पर्धा यंदा यूएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरला UAE विरुद्धच्या लढतीनं आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल. १४ सप्टेंबरला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशा प्रतिक्रिया उमटल्या. पण दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार हे पक्के ठरले आहे. यासंदर्भात BCCI सचिन देवजीत सैकिया यांनी पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यातील सामन्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक यांच्यातील सामन्यासंदर्भात काय म्हणाले BCCI सचिव?
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयशी संवाद साधताना भारत-पाक सामन्यासंदर्भातील बोर्डाची भूमिका स्पष्ट केलीये. 'मैत्रीपूर्ण संबंध' नसले तरी भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत पाक विरुद्ध का खेळणार? यामागची गोष्टही त्यांनी सांगितली. ते म्हणाले की, "बीसीसीआयच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, केंद्र सरकारने औपचारिकरित्या ठरवलेल्या प्रत्येक गोष्टीचं आम्हाला पालन करावं लागतं. अलीकडे निश्चित करण्यात आलेल्या धोरणामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, भारतातीय संघाचा सहभाग असलेल्या कोणत्याही बहुराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केंद्र सरकारकडून अशा देशांविरुद्ध खेळण्यास कोणतीही बंदी घातलेली नाही, ज्यांच्याशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. त्यामुळे भारताने कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेत सर्व सामने खेळले पाहिजेत."
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
...तर शत्रू राष्ट्राशी खेळण्याचा प्रश्नच येत नाही
आशिया चषक स्पर्धा ही आशियाई खंडातील वेगवेगळ्या देशांचा समावेश असणारी स्पर्धा आहे. आयसीसी स्पर्धेप्रमाणेच या बहु राष्ट्रीय स्पर्धेतही एखाद्या देशाविरुद्ध संबंध चांगले नसले तरी खेळावेच लागेल. पण द्विपक्षीय मालिकेत शत्रू राष्ट्राशी खेळण्याचा प्रश्नच उरत नाही, अशा आशयाच्या शब्दांत याबाबतीत पाकिस्तान विरोधात घेतलेली भूमिका कायम आहे, यावरही देवजीत सैकिया यांनी भर दिला.
माघार घेतली तर काय नुकसान होते तेही सांगितले
देवजीत सैकिया यावेळी असेही म्हणाले की, "भारताने आशियाई क्रिकेट परिषद किंवा आयसीसी सारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धेचा बहिष्कार केला. फक्त क्रिकेटचं नव्हे तर अन्य कोणत्याही खेळासंदर्भात भारताने एखाद्या विशिष्ट देशाविरुद्ध खेळण्यास नकार दिला. तर भारतीय महासंघावर निर्बंध लागू शकतात." असेही ते यावेळी म्हणाले.
Web Title: BCCI Breaks Silence On India vs Pakistan Match Asia Cup T20 2025 Devajit Saikia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.