Join us
Daily Top 2Weekly Top 5

BCCI Annual Contract : रोहित शर्मासह विराट कोहलीचं डिमोशन; मोहम्मद शमी-ईशान किशन करारातून बाहेर

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आधी ज्या श्रेणीत होते ती A + श्रेणीच हटवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 23:47 IST

Open in App

BCCI Annual Contract Rohit Sharma Virat Kohli Demotion Grade B : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२५-२६ च्या हंगामासाठी वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या नव्या वार्षिक करारात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आधी ज्या श्रेणीत होते ती A + श्रेणीच हटवण्यात आली आहे. याशिवाय या दोन्ही दिग्गजांना आता B श्रेणीत सामील करण्यात आले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मोहम्मद शमीसह ईशानचा पत्ता कट

टीम इंडियात कमबॅकसाठी संघर्ष करत असलेल्या मोहम्मद शमीसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वर्णी लागलेल्या ईशान किशन करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिसत नाही. बीसीसीआयने ‘एक्स’ अकाउंटवरून वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी बीसीसीआयने कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीत ठेवलं आहे जाणून घेऊयात सविस्तर

पाकचा हा डावही फसला! ICC नं मागण्या फेटाळल्यावर भारतासोबत खेळण्यास 'राजी'; अधिकृत घोषणा बाकी

बीसीसीआयची २०२५-२६ साठीची करारबद्ध खेळाडूंची संपूर्ण  

ग्रेड A

  • शुभमन गिल
  • जसप्रीत बुमराह
  • रविंद्र जडेजा

ग्रेड B

विराट कोहलीरोहित शर्मावॉशिंग्टन सुंदरकेएल राहुलमोहम्मद सिराजहार्दिक पंड्यारिषभ पंतकुलदीप यादवयशस्वी जैस्वालसूर्यकुमार यादवश्रेयस अय्यर

ग्रेड C

  • अक्षर पटेल
  • तिलक वर्मा
  • रिंकू सिंग
  • शिवम दुबे
  • संजू सॅमसन
  • अर्शदीप सिंग
  • प्रसिद्ध कृष्णा
  • आकाश दीप
  • ध्रुव जुरेल
  • हर्षित राणा
  • वरुण चक्रवर्ती
  • नितीश रेड्डी
  • अभिषेक शर्मा
  • साई सुदर्शन
  • रवि बिश्नोई
  • ऋतुराज गायकवाड 

विराट-रोहितला प्रत्येकी ४-४ कोटींचा फटका?

मागील वर्षी  ग्रेड A+ मध्ये असलेल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये एवढे पॅकज होते.  ग्रेड A मध्ये असणाऱ्या खेळाडूंना ५ कोटी रुपये तर ग्रेड B मध्ये ३ कोटी आणि  ग्रेड C मधील खेळाडूंना प्रत्येकी १-१ कोटी रुपये एवढी रक्कम बीसीसीआयकडून मिळायची. जर यंदाही हाच दर कायम ठेवण्यात आला, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना प्रत्येकी सुमारे ४ कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, कारण त्यांना आता ग्रेड A+ ऐवजी ग्रेड B मध्ये स्थान देण्यात आलं आहे.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : BCCI Contract: Rohit, Kohli Demoted; Shami, Kishan Out of Contract List

Web Summary : BCCI's new contract list sees Rohit Sharma and Virat Kohli demoted to Grade B. Mohammed Shami and Ishan Kishan are excluded. Gill, Bumrah, and Jadeja are in Grade A. Players may face financial losses due to grade changes.
टॅग्स :बीसीसीआयविराट कोहलीरोहित शर्माइशान किशनमोहम्मद शामीशुभमन गिलजसप्रित बुमराहरवींद्र जडेजा