BCCI Annual Contract Rohit Sharma Virat Kohli Demotion Grade B : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२५-२६ च्या हंगामासाठी वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या नव्या वार्षिक करारात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आधी ज्या श्रेणीत होते ती A + श्रेणीच हटवण्यात आली आहे. याशिवाय या दोन्ही दिग्गजांना आता B श्रेणीत सामील करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद शमीसह ईशानचा पत्ता कट
टीम इंडियात कमबॅकसाठी संघर्ष करत असलेल्या मोहम्मद शमीसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वर्णी लागलेल्या ईशान किशन करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिसत नाही. बीसीसीआयने ‘एक्स’ अकाउंटवरून वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी बीसीसीआयने कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीत ठेवलं आहे जाणून घेऊयात सविस्तर
पाकचा हा डावही फसला! ICC नं मागण्या फेटाळल्यावर भारतासोबत खेळण्यास 'राजी'; अधिकृत घोषणा बाकी
बीसीसीआयची २०२५-२६ साठीची करारबद्ध खेळाडूंची संपूर्ण
ग्रेड A
- शुभमन गिल
- जसप्रीत बुमराह
- रविंद्र जडेजा
ग्रेड B
विराट कोहली
रोहित शर्मा
वॉशिंग्टन सुंदर
केएल राहुल
मोहम्मद सिराज
हार्दिक पंड्या
रिषभ पंत
कुलदीप यादव
यशस्वी जैस्वाल
सूर्यकुमार यादव
श्रेयस अय्यर
ग्रेड C
- अक्षर पटेल
- तिलक वर्मा
- रिंकू सिंग
- शिवम दुबे
- संजू सॅमसन
- अर्शदीप सिंग
- प्रसिद्ध कृष्णा
- आकाश दीप
- ध्रुव जुरेल
- हर्षित राणा
- वरुण चक्रवर्ती
- नितीश रेड्डी
- अभिषेक शर्मा
- साई सुदर्शन
- रवि बिश्नोई
- ऋतुराज गायकवाड
विराट-रोहितला प्रत्येकी ४-४ कोटींचा फटका?
मागील वर्षी ग्रेड A+ मध्ये असलेल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये एवढे पॅकज होते. ग्रेड A मध्ये असणाऱ्या खेळाडूंना ५ कोटी रुपये तर ग्रेड B मध्ये ३ कोटी आणि ग्रेड C मधील खेळाडूंना प्रत्येकी १-१ कोटी रुपये एवढी रक्कम बीसीसीआयकडून मिळायची. जर यंदाही हाच दर कायम ठेवण्यात आला, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना प्रत्येकी सुमारे ४ कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, कारण त्यांना आता ग्रेड A+ ऐवजी ग्रेड B मध्ये स्थान देण्यात आलं आहे.