मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात भारत व जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. हे तीनही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी या संघांचे नेतृत्व अनुक्रमे हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि मिताली राज हे करणार आहेत.
असे असतील तीन संघ
व्हेलॉसिटी - मिताली राज ( कर्णधार), अमेलिया केर ( न्यूझीलंड), डॅनियल वॅट ( इंग्लंड), देविका वैद्य, एकता बिश्त, हॅली मॅथ्यू ( वेस्ट इंडिज), जहानरा आलम ( बांगलादेश), कोमल झानजाद, शेफाली वर्मा, शिखा पांडे, सुश्मा वर्मा ( यष्टिरक्षक), सुश्री दिव्यादर्शीनी, वेदा कृष्णमुर्थी.
ट्रेलब्लेझर्सः स्मृती मानधना ( कर्णधार), भारती फुलमाळी, दयालन हेमलथा, दिप्ती शर्मा, हर्लीन देओल, जसिया अख्तर, झुलन गोस्वामी, आर कल्पना ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, शाकेरा सेलमन ( वेस्ट इंडिज), सोफी एस्लेस्टन ( इंग्लंड), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडिज), सुझी बॅट्स ( न्यूझीलंड).
सुपरनोव्हाः हरमनप्रीत कौर ( कर्णधार), अनुजा पाटील, अरुंधती रेड्डी, चमारी अथापट्टू (श्रीलंका), जेमिमा रॉड्रीग्स, ली ताहूहू ( न्यूझीलंड), मानसी जोशी, नटालीए स्कीव्हर ( इंग्लंड), पूनम यादव, प्रिया पुनिया, राधा यादव, सोफी डेव्हिन( न्यूझीलंड), तानिया भाटिया ( यष्टिरक्षक).
असे असेल वेळापत्रक6 मे - सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स
8 मे - ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी
9 मे - सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी
11 मे - अंतिम सामना