Team India: 9 T20, 6 वनडे नि 4 टेस्ट.... टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम! BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

बीसीसीयने भारतीय संघाच्या आगामी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:03 PM2022-12-08T13:03:15+5:302022-12-08T13:03:31+5:30

whatsapp join usJoin us
BCCI announces schedule of team india for home series against Sri Lanka, New Zealand & Australia | Team India: 9 T20, 6 वनडे नि 4 टेस्ट.... टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम! BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

Team India: 9 T20, 6 वनडे नि 4 टेस्ट.... टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम! BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाच्या आगामी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ मायदेशात आगामी काळात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका खेळणार आहे. 2023च्या नवीन वर्षाची सुरूवात भारतीय संघ 3 सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतून करेल. ही मालिका श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. 
 
भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

  1.  3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  2.  5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  3. 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  4. 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  5. 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  6. 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकांनंतर भारतीय संघ मायदेशातच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळेल. ही मालिका हैदराबाद, रायपूर आणि इंदूर येथे पार पडेल. याशिवाय भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिकाही खेळणार आहे.

भारत विरूद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

  1. 18 जानेवारी, बुधवार, पहिला वन डे सामना, हैदराबाद 
  2. 21 जानेवारी, शनिवार, दुसरा वन डे सामना, रायपूर
  3. 24 जानेवारी, मंगळवार, तिसरा वन डे सामना, इंदौर
  4. 27 जानेवारी, शुक्रवार, पहिला ट्वेंटी-20 सामना, रांची
  5. 29 जानेवारी, रविवार, दुसरा ट्वेंटी-20 सामना, लखनौ
  6. 1 फ्रेब्रुवारी, बुधवार, तिसरा ट्वेंटी-20 सामना, अहमदाबाद

 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: BCCI announces schedule of team india for home series against Sri Lanka, New Zealand & Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.