Join us

IND vs WI Series : BCCIची मोठी घोषणा; Rohit Sharmaच्या पुनरागमनाच्या मालिकेत केला बदल, जाणून घ्या वेळापत्रक

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत बीसीसीयनं मोठा बदल जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 21:00 IST

Open in App

India vs West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत बीसीसीयनं मोठा बदल जाहीर केला. वेस्ट इंडिजचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे आणि त्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन या मालिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेतील तीन वन डे सामन्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.

या मालिकेतून रोहित शर्मा टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. सध्या तो दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. वन डे संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिलीच वन डे मालिका असणार आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८  व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माबीसीसीआय
Open in App